NIOS च्या दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी Rojgar News

NIOS च्या दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी Rojgar News

2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजेच दहावी आणि बारावीच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये आयोजित परीक्षांसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे. या महिन्यांमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केले आहे, ते प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी आपले अॅडमिट कार्ड संस्थेची अधिकृत वेबसाइट sdmis.nios.ac.in वरून डाऊनलोड करू शकतात. या वृत्तातही अॅडमिट कार्डची थेट लिंक देण्यात आली आहे. एनआयओएसद्वारे प्रॅक्टिकल परीक्षेच्या अॅडमिट कार्ड संबंधी अपडेट संस्थेने जारी केले आहे. यानुसार, 'उमेदवारांनी जर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षेचे परीक्षा शुल्क भरले असेल आणि उमदेवारांचे छायाचित्र एनआयओएसकडे उपलब्ध असेल, तरच उमेदवारांना हॉलतिकीट डाऊनलोड करता येईल. जर छायाचित्र गहाळ झाल्याने तुमचे हॉलतिकीट तयार झाले नसेल, तर तुमच्या प्रादेशिक कार्यालयाशी त्वरित संपर्क साधा.' २७ सप्टेंबर पासून होणार परीक्षा एनआयओएसने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ च्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी अधिसूचना अलीकडेच १३ सप्टेंबर रोजी जारी केली होती. त्यानुसार, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्तांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २७ सप्टेंबर २०२१ पासून आयोजित करण्यात येणार आहेत. पुढील पद्धतीने डाऊनलोड कर अॅडमिट कार्ड ज्या विद्यार्थ्यांनी एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केले आहे आणि परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांनी आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट, sdmis.nios.ac.in वर जावे. तेथे होमपेजवर एक्झामिनेशन सेक्शन मध्ये संबंधित हॉलतिकीट डाऊनलोड लिंक वर क्लिक करा. यानंतर नव्या पेज वर आपला एनरोलमेंट नंबर आणि अन्य माहिती भरून सबमिट करा. यानंतर अॅडमिट कार्ड स्क्रीन वर दिसू लागेल. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि त्याची एक प्रत भविष्यातील संदर्भासाठी सांभाळून ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Xxzgyl
via nmkadda

0 Response to "NIOS च्या दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel