Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-09-09T14:43:49Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NIRF Ranking 2021: देशातील १५ टॉप संशोधन संस्थांची यादी, IIT मुंबईचे स्थान जाणून घ्या Rojgar News

Advertisement
Ranking 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर (Indian Institute of Science, IISc Bengaluru) ही देशातील सर्वोत्तम ठरली आहे. आयआयटी मद्रास दुसऱ्या क्रमांकाची आणि आयआयटी मुंबई ही संशोधनाच्या कॅटेगरीमध्ये तिसरी सर्वोत्तम संस्था आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केलेल्या एनआयआरएफ रँकिंग २०२१ यादीतील संस्थांना हे रँकिंग देण्यात आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली चौथ्या स्थानावर आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर पश्चिम बंगाल पाचव्या स्थानी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर उत्तर प्रदेशला सहाव्या स्थानी आहे. यावेळी एकूण कॅटेगरीमध्ये संशोधनाची नवी कॅटेगरी निर्माण करण्यात आली. NIRF Ranking 2021: टॉप १५ संशोधन संस्था १) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर २) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास- तामिळनाडू ३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई- महाराष्ट्र ३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नवी दिल्ली ५)इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, खरगपूर- पश्चिम बंगाल ६) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर- उत्तर प्रदेश ७) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, रुड़की उत्तराखंड ८) अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, दिल्ली ९) भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी आसाम १०) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, महाराष्ट्र ११) दिल्ली विद्यापीठ, दिल्ली १२) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तामिळनाडू १३) होमी भाभा राष्ट्रीय संस्था, महाराष्ट्र १४) बनारस हिंदू विद्यापीठ, उत्तर प्रदेश १५) भारतीय तंत्रज्ञान संस्था, हैदराबाद--तेलंगणा एकूण विद्यापीठे, इंजिनीअरिंग संस्था, महाविद्यालये, मॅनेजमेंट संस्था, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर, लॉ अशा विविध अभ्यासक्रमांच्या संस्थांच्या बाबतीत हे रँकिंग केले जाते. संस्थांमधील शिकवणी, सोयी-सुविधा, संशोधन, पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आदी विविध विविध निकषांवर ही क्रमवारी दिली जाते. '११ कॅटगरीमधील एनआयआरएफ रँकिंग २०२१ जाहीर करताना मला आनंद होत आहे. मी सर्व रँकिंग मिळालेल्या संस्थांचे अभिनंदन करतो. आज देशात ५० हजारांहून अधिक उच्च शिक्षण संस्था आणि ५० दशलक्ष विद्यार्थी आहेत. या सर्वांसाठी रँकिंग महत्त्वाचे आहे असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. या वर्षीच्या एनआयआरएफ रँकिंग २०२१ मध्ये आयआयटी मद्रास पुन्हा देशातील सर्वोत्तम संस्था ठरली आहे. विद्यापीठ श्रेणीमध्ये, आयआयएससी बंगळुर या वर्षी पहिल्या स्थानावर आहे आणि जेएनयू दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे, आयआयटी मद्रास ही इंजिनीअरिंग कॅटगरीतील देशातील सर्वोत्तम संस्था ठरली आहे. त्यानंतर आयआयटी दिल्ली आणि त्यानंतर आयआयटी मुंबईचा क्रमांक लागतो. एनआयआरएफ रँकिंग २०२१ टॉप १० कॅटेगरी एनआयआरएफ रँकिंग २०२१ एकूण १० कॅटेगरीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. या टॉप कॅटेगरीमध्ये विद्यापीठ, मॅनेजमेंट, महाविद्यालय, फार्मसी, वैद्यकीय, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, आणि एआरआयआयए (इनोव्हेशन अचीव्हमेंट्सवरील संस्थांची अव्वल रँकिंग) यांचा समावेश आहे. नॅशनल इंस्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्वीकारून २९ सप्टेंबर २०१५ रोजी लाँच केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l3iVtk
via nmkadda