Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-09-09T05:43:31Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NIRF Ranking 2021: देशातील टॉप संस्थांची यादी होणार जाहीर, 'या' निकषांवर निवड Rojgar News

Advertisement
NIRF : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान 2021 वर्षासाठी राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (NIRF) रँकिंग जाहीर करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केलेल्या अपडेटनुसार शिक्षणमंत्री एनआयआरएफने तयार केलेल्या भारतीय शैक्षणिक संस्थांची यावर्षीची रॅंकिंग जाहीर करतील. शिक्षणमंत्री एनआयआरएफ रँकिंग २०२१ व्हर्च्युअल माध्यमातून जाहीर करणार आहेत. हा कार्यक्रम शिक्षण मंत्रालयाच्या सोशल मीडिया अकाऊंट्स वरुन थेट पाहता येणार आहे. एनआयआरएफ रँकिंग टिचिंग, लर्निंग, रिसर्च, व्यावसायिक पद्धती, आउटरीच आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे विद्यापीठ आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये रॅंकिंग जाहीर केली जाते. एनआयआरएफ रँकिंग २०२१ टॉप १० कॅटेगरी एनआयआरएफ रँकिंग २०२१ एकूण १० कॅटेगरीमध्ये जाहीर केली जाणार आहे. या टॉप कॅटेगरीमध्ये विद्यापीठ, व्यवस्थापन, महाविद्यालय, फार्मसी, वैद्यकीय, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, आणि एआरआयआयए (इनोव्हेशन अचीव्हमेंट्सवरील संस्थांची अव्वल रँकिंग) यांचा समावेश आहे. नॅशनल इंस्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्वीकारून २९ सप्टेंबर २०१५ रोजी लाँच केले. निकष जाणून घ्या एकूण विद्यापीठे, इंजिनीअरिंग संस्था, महाविद्यालये, मॅनेजमेंट संस्था, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर, लॉ अशा विविध अभ्यासक्रमांच्या संस्थांच्या बाबतीत हे रँकिंग केले जाते. संस्थांमधील शिकवणी, सोयी-सुविधा, संशोधन, पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आदी विविध विविध निकषांवर ही क्रमवारी दिली जाते. करोना प्रादुर्भाव काळात शैक्षणिक संस्था बंद राहिल्याने या संदर्भातील माहिती मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे यावर्षी NIRF रँकिंग जाहीर करण्यास देखील उशीर झाला आहे. गेल्यावर्षी एनआयआरएफ रँकिंग १० जूनलाच जाहीर करण्यात आली होती. २०२० ची NIRF रँकिंग २०२० ची NIRF रँकिंग ११ जून रोजी जाहीर करण्यात आली. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी एनईआरएफ रँकिंग ऑनलाइन माध्यमातून जाहीर करण्यात आली होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासला भारताची सर्वोच्च संस्था २०२० (एकूण श्रेणी) घोषित करण्यात आली. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बंगळूर हे सर्वश्रेष्ठ विद्यापीठ ठरले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा क्रमांक लागला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l5D02i
via nmkadda