Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-09-09T09:43:11Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NIRF Ranking 2021: देशातील टॉप १० इंजिनीअरिंग संस्था, जाणून घ्या यादी Rojgar News

Advertisement
Engineering Ranking 2021: राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (NIRF) रँकिंग केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले आहे. व्हर्च्युअल माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात एनआयआरएफ इंडिया रँकिंग २०२१ जाहीर करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या youtu.be/NtC0G3lWl2A या यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. NIRF रँकिंग यादी २०२१ अधिकृत वेबसाइट nirfindia.org वर देखील अपलोड करण्याात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास (आयआयटी मद्रास) ने एनआयआरएफ इंडिया रँकिंगच्या इंजिनीअरिं कॅटगरीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्लीने पुन्हा दुसरे स्थान मिळवले. दहावे स्थान वगळता इतर ९ संस्थांनी यावर्षी देखील मागच्या वर्षीचे त्यांचे रँकिंग कायम ठेवले आहे. रँक १: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ((IIT)मद्रास रॅंक २: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली रँक ३: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई रँक ४: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)कानपूर रँक ५: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर रँक ६: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुड़की रँक ७: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटी रँक ८: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ((IIT) हैदराबाद रॅंक ९: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) तिरुचिरापल्ली रॅंक १० : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT)सुरथकल एकूण विद्यापीठे, , महाविद्यालये, मॅनेजमेंट संस्था, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर, लॉ अशा विविध अभ्यासक्रमांच्या संस्थांच्या बाबतीत हे रँकिंग केले जाते. संस्थांमधील शिकवणी, सोयी-सुविधा, संशोधन, पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आदी विविध विविध निकषांवर ही क्रमवारी दिली जाते. '११ कॅटगरीमधील एनआयआरएफ रँकिंग २०२१ जाहीर करताना मला आनंद होत आहे. मी सर्व रँकिंग मिळालेल्या संस्थांचे अभिनंदन करतो. आज देशात ५० हजारांहून अधिक उच्च शिक्षण संस्था आणि ५० दशलक्ष विद्यार्थी आहेत. या सर्वांसाठी रँकिंग महत्त्वाचे आहे असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. या वर्षीच्या एनआयआरएफ रँकिंग २०२१ मध्ये आयआयटी मद्रास पुन्हा देशातील सर्वोत्तम संस्था ठरली आहे. विद्यापीठ श्रेणीमध्ये, आयआयएससी बंगळुर या वर्षी पहिल्या स्थानावर आहे आणि जेएनयू दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे, आयआयटी मद्रास ही कॅटगरीतील देशातील सर्वोत्तम संस्था ठरली आहे. त्यानंतर आयआयटी दिल्ली आणि त्यानंतर आयआयटी मुंबईचा क्रमांक लागतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yWIXmQ
via nmkadda