NIRF रॅंकिंग ९ सप्टेंबरला होणार जाहीर, गेल्यावर्षीच्या टॉप संस्थांची यादी जाणून घ्या Rojgar News

NIRF रॅंकिंग ९ सप्टेंबरला होणार जाहीर, गेल्यावर्षीच्या टॉप संस्थांची यादी जाणून घ्या Rojgar News

NIRF Ranking 2021: केंद्रीय शिक्षणमंत्री हे ९ सप्टेंबर रोजी नॅशनल इंस्टिट्यूशनल फ्रेमवर्क (NIRF)रॅंकिंग जाहीर करणार आहेत. देशभरातील शिक्षण संस्थांची रॅंकिंग २०२१ व्हर्चुअल माध्यमातून गुरुवार दुपारी १२ वाजता अधिकृतरित्या जाहीर केली जाईल. यानंतर देशातील महाविद्यालये/शैक्षणिक संस्थांची यादी श्रेणीनुसार अधिकृत वेबसाइट nirfindia.org वर प्रसिद्ध केली जाईल. करोनामुळे देशभरातील शैक्षणिक संस्था बंद झाल्यामुळे यावर्षी एनआयआरएफ क्रमवारी जाहीर करण्यात उशीर झाला. २०२० ची NIRF रँकिंग ११ जून रोजी जाहीर करण्यात आली. एनआयआरएफ रँकिंग टिचिंग, लर्निंग, रिसर्च, व्यावसायिक पद्धती, आउटरीच आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे विद्यापीठ आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये रॅंकिंग जाहीर केली जाते. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी एनईआरएफ रँकिंग ऑनलाइन माध्यमातून जाहीर करण्यात आली होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासला भारताची सर्वोच्च संस्था २०२० (एकूण श्रेणी) घोषित करण्यात आली. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बंगळूर हे सर्वश्रेष्ठ विद्यापीठ ठरले. स्थानी होते. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा क्रमांक लागला. एनआयआरएफ रँकिंग २०२० च्या विविध श्रेणींनुसार टॉप शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे. ओव्हरऑल कॅटेगरी - आयआयटी मद्रास विद्यापीठ - IISc बंगळूर इंजिनीअरिंग - आयआयटी मद्रास व्यवस्थापन - आयआयएम अहमदाबाद फार्मसी - जामिया हमदर्द कॉलेज - मिरांडा हाऊस औषध - अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था - एम्स नवी दिल्ली कायदा - NLSIU बंगळूर वास्तुकला - आयआयटी खरगपूर दंतचिकित्सा - मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस (एमएएमसी), नवी दिल्ली


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A4AsYB
via nmkadda

0 Response to "NIRF रॅंकिंग ९ सप्टेंबरला होणार जाहीर, गेल्यावर्षीच्या टॉप संस्थांची यादी जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel