Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-09-30T14:43:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NPCIL मध्ये विविध पदांवर भरती, डिप्लोमाधारकांना संधी Rojgar News

Advertisement
recruitment 2021: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in वर अर्ज करु शकतात. यावर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, पगार यांचा तपशील देण्यात आला आहे. एनपीसीआयएलच्या नोटिफिकेशननुसार ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण ७५ पदांची भरती केली जाईल. यापैकी फिटरसाठी २० आणि ट्यूनरसाठी ४ जागा रिक्त आहेत. दुसरीकडे, मशिनिस्टसाठी २, इलेक्ट्रिशियनसाठी ३० आणि वेल्डरच्या ४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. याव्यतिरिक्त ९ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ४ ड्राफ्ट्समन (सिव्हिल) आणि २ सर्व्हेअरसाठी भरती केली जाणार आहे. पदांसाठी किमान वय १४ वर्षे तर कमाल वय २४ वर्षे असावे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत देण्यात आली आहे. उमेदवाराकडे आयटीआय डिप्लोमा इन फिटरचे शिक्षण असावे. याशिवाय, मशीनिस्ट, वेल्डरसह इतर व्यापारांमध्ये संबंधित डिप्लोमा असावा. या व्यतिरिक्त, शैक्षणिक पात्रता किंवा भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर मिळू शकेल. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org च्या मााध्यमातून भरावा. उमेदवारांना आधी स्वत:ची नोंदणी करावी लागेल. अधिकृत वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर संबंधित ट्रेडसाठी एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन नंबर E०१२१०९०००४६ चा वापर करुन लॉगिन करावे लागेल. १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचा. अर्जामध्ये काही गोंधळ आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kXwrA1
via nmkadda