'OBC च्या यूपीएससी आणि एमपीएससी उमेदवारांना मासिक शिष्यवृत्ती द्या' Rojgar News

'OBC च्या यूपीएससी आणि एमपीएससी उमेदवारांना मासिक शिष्यवृत्ती द्या' Rojgar News

Mahajyoti Candidate Stipend: महाज्योतीच्या आणि उमेदवारांना मासिक शिष्यवृत्ती द्यावी अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केली आहे. ओबीसी पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. BARTI आणि SARATHI उमेदवारांना मासिक शिष्यवृत्ती मिळते मग ओबीसी उमेदवारांना का नाही? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. महाराष्ट्र शासनाद्वारे सारथी अंतर्गत मराठा समाजाच्या उमेदवारांना आणि BARTI/TRTI अंतर्गत SCs/STs समाजाच्या उमेदवारांना संबंधित संस्थांद्वारे मासिक शिष्यवृत्ती दिली जाते. यूपीएससी, एमपीएससी प्रवेश परीक्षांची तयारी करताना ऑनलाइन/ऑफलाइन क्लासेससाठी ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली आहे. सारथी अंतर्गत संबंधित यूपीएससी उमेदवारांना १३ हजार रुपये, एमपीएससी उमेदवारांना ७ ते ८ हजार रुपये आणि BARTI च्या वतीने १० हजार रुपये दिले जातात अशी माहिती त्यांनी दिली. उमेदवारांना फक्त ऑनलाइन क्लासेसची सुविधा देण्यात येते. मराठा आणि एससी/एसटी उमेदवारांसारखे ओबीसी, वीजेएनटी, एसबीसी उमेदवारांना महाराष्ट्र शासनाद्वारे मासिक शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. हा भेदभाव ओबीसी, वीजेएनटी, एसबीसी उमेदवारांना नुकसानदायक ठरणार आहे. मासिक शिष्यवृत्ती न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण होऊन हे उमेदवार यूपीएससी/एमपीएससीची तयारी करु शकणार नाहीत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेसची मिळालेली सुविधा फायदेशीर ठरणार नसल्याचेही टिळेकर म्हणाले. हा प्रकार भारतीय संविधानातील समानतेच्या हक्काचे उल्लंघन आहे. इतरांना सुविधा मिळावीच. पण ओबीसी विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीची तितकीच गरज आहे. मासिक शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना घरभाडे, लायब्ररी फी, पुस्तकांचा खर्च, मेसच्या खर्चासाठी आर्थिक मदत होते. म्हणून शासनाने यात भेदभाव न करता न्याय द्यावा असे आवाहन टिळेकर यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lQk3B5
via nmkadda

0 Response to "'OBC च्या यूपीएससी आणि एमपीएससी उमेदवारांना मासिक शिष्यवृत्ती द्या' Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel