Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-24T08:43:30Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

QS Employability Rankings च्या टॉप ५०० मध्ये 'या' भारतीय संस्थांना स्थान Rojgar News

Advertisement
QS Employability : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (), बेंगळुरू, एकूण ६ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यासह एकूण १२ संस्थांना जगातील टॉप ५०० विद्यापीठांमध्ये स्थान देण्यात आले आहे. क्यूएस एम्प्लॉयबिलिटी रँकिंग २०२२ मध्ये रँकिंग असलेल्या १२ भारतीय संस्थांमध्ये आयआयटी मुंबई पहिली आहे. जिला १०१-११० क्रमांकामध्ये स्थान देण्यात आले आहे. तर IIT दिल्ली १५१-१६०, IIT खरगपूर २०१-२५०, IIT कानपूर २५१-३०० आणि IIT रुड़की ५०० व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे आयआयएससी बंगळुरू ३०१-५०० रँक कॅटेगरीमध्ये आहे. विद्यापीठांच्या रॅंकिंमध्ये भारतातील तीन केंद्रीय विद्यापीठांना क्यूएस एम्प्लॉयबिलिटी रँकिंग २०२२ मध्ये स्थान देण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठांचा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे ओपी जिंदाल विद्यापीठ, सोनीपत आणि BITS म्हणजेच BITS पिलानी यांना खासगी विद्यापीठांमधील नवीनतम QS क्रमवारीत स्थान देण्यात आले आहे. बीआयटीएस पिलानी आणि मुंबई विद्यापीठाला २५१-३०० दरम्यान स्थान देण्यात आले आहे. क्यूएस एम्प्लॉयबिलिटी रँकिंग २०२२ जाहीर करणारी कंपनी Quacquarelli Symondsच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अपडेटनुसार, जग करोना साथीच्या प्रभावातून सावरु लागल्याने कौशल्य आणि गुणवत्तेसह पदवी मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये रोजगारक्षमतेतील आत्मविश्वास वाढत आहे. रँकिंगमध्ये स्थान मिळवलेल्या प्रत्येक संस्थेने मॉर्डन वर्कप्लेससाठी आवश्यक असलेल्या 'सॉफ्ट स्किल्स'सह पदवीधर उमेदवार निर्माण करण्याची क्षमता तयार केल्याचे यात म्हटले आहे. तसेच जगभरातील पदवीधरांना भेडसावणाऱ्या कठीण स्पर्धा पाहता, विद्यार्थ्यांनी त्यांचे विद्यापीठ त्यांना जागतिक दर्जाच्या एम्प्लॉयरसोबत जोडून आणि आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त करून त्यांना पूर्णवेळ नोकरीसाठी सज्ज करण्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे असे यामध्ये म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ADIzvt
via nmkadda