Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-09-08T11:43:38Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

RBI Recruitment 2021: आरबीआयमध्ये परीक्षेशिवाय भरती Rojgar News

Advertisement
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. RBI ने बँक्स मेडिकल कन्सल्टंट (RBI BMC) पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर २०२१ आहे. पात्र अर्जदारांना परीक्षा न घेता केवळ मुलाखतीच्या आधारावर नोकरी दिली जाईल. रिझर्व्ह बँकेने नोकरीसंबंधी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की ८ सप्टेंबर २०२१ रोजी अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in वर जारी करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २०२१ अधिसूचनेची थेट या वृत्तात पुढे दिली आहे. कोण करू शकतो अर्ज ? मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया अॅलोपॅथी सिस्टीमच्या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून एमबीबीएस पदवी आवश्यक. याशिवाय, ज्या उमेदवारांनी जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे ते देखील आरबीआय वैद्यकीय सल्लागार भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून किमान २ वर्षांचा अनुभव असावा. अधिक तपशीलांसाठी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. RBI भरतीसाठी कशी असेल निवड प्रक्रिया? वैयक्तिक मुलाखतीत कामगिरीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या अर्जदारांची मुलाखतीनंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल. पगार किती? आरबीआय बीएमसी भरती २०२१ साठी निवडलेल्या पात्र उमेदवारांना ३ वर्षांसाठी प्रति तास १००० रूपये दराने करारानुसार नियुक्त केले जाईल. कामाचे तास सोमवार ते गुरुवार सकाळी ९ ते ११ आणि संध्याकाळी ४.४५ ते ६ तर शुक्रवारी सकाळची शिफ्ट दुपारी १२ पासून असेल. रविवारी फक्त सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत काम केले जाईल. अर्ज कसा करावा? इच्छुक उमेदवार प्राचार्य, कृषी कृषी महाविद्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक, युनिव्हर्सिटी रोड, पुणे - ४११०१६ येथे ५ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करू शकतात. अर्ज सीलबंद कव्हरमध्ये पाठवायचा आहे. पाकिटावर 'बँकेच्या वैद्यकीय सल्लागार पदासाठी कराराच्या आधारावर निर्धारित तासिका मोबदल्यासह अर्ज' असे लिहावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DQ2wRw
via nmkadda