Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-27T11:43:09Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Reliance Jio मध्ये भरती, वेबसाइटवर जाऊन करा ऑनलाइन अर्ज Rojgar News

Advertisement
Reliance : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी रिलायन्स जिओ (Jio Recruitment 2021) मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे रिलायन्स जिओने मुंबईत भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार कंपनीत इंजिनीअर पदांची भरती केली जाणार आहे. आयटी प्रोफेशनल्स असलेल्या तरुणांना येथे काम करण्याची संधी आहे. आयटी आणि टेलिकॉम विभागातील भरतीसाठी रिलायन्स जिओकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, तपशील यांची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या तरुणांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. रिलायन्स जिओच्या मुंबईतील कार्यालयात ही पदे रिक्त आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. रिक्त पदांचा तपशील ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी (Graduate Engineer Trainee Network) शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी (Graduate Engineer Trainee Network) या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतून B.E./ B.Tech पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे Cisco CCNA या कोर्समध्ये सर्टिफिकेशन असणे महत्वाचे आहे. पगार उमेदवाराची शैक्षणिक आर्हता आणि अनुभव पाहून पगार ठरविण्यात येईल. कामाचे स्वरुप या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना रिलायन्स जिओ व्यवसायाचे नियोजन आणि नियामक संघांकडून आवश्यकता जाणून घेणे, संबंधित कामांचे प्लानिंग करणे, महिन्याचा प्लान तयार करण्याचे काम करावे लागेल. तसेच ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नेटवर्क प्लानिंग करणे तसेच ट्राफिक फ्री नेटवर्क ठेवणे अशी कामे देखील पाहावी लागणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना क्रॉस-फंक्शनल टीम सदस्यांशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे. तसेच दिलेली सर्व कामं वेळेत पूर्ण करणे देखील गरजेचे आहे. Reliance jio Recruitment: असा करा अर्ज अधिकृत वेबसाइट www.jio.com वर जा. होमपेजवरील करीअर सेक्शनमध्ये जा नवीन पेज खुले होईल Reliance Jio Trainee Jobs यावर क्लिक करा संबंधित जॉब निवडून अप्लायवर क्लिक करा जिओ ग्रॅज्युएट इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोटिफिकेशनमधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा त्यानंतर अर्ज करा. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zEw3ug
via nmkadda