एसबीआय अप्रेंटिस भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'असे' करा डाऊनलोड Rojgar News

एसबीआय अप्रेंटिस भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'असे' करा डाऊनलोड Rojgar News

Admit Card 2021: भारतीय स्टेट बँके (SBI) ने अप्रेंटिस भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. एसबीआयने विविध पदांच्या परीक्षेचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाहीर केले आहे. जे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात ते आवश्यक तपशीलांसह अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून प्रवेशपत्र पाहू शकतात. तसेच उमेदवार बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरुन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. महत्वाच्या तारखा प्रवेशपत्र जाहीर करण्याची तारीख - ६ सप्टेंबर २०२१ एसबीआय प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख - २० सप्टेंबर २०२१ एसबीआय अप्रेंटिस भरती परीक्षा - २० सप्टेंबर २०२१ Sbi Apprentices Recruitment : प्रवेशपत्र करा डाऊनलोड प्रशिक्षणार्थी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी 'करिअर' सेक्शनमध्ये जा 'Apprentices Act, 1961' च्या अंतर्गत 'Engagement of Apprentices परीक्षेसाठी प्रवेशपत्र' या लिंकवर क्लिक करा. नोंदणी क्रमांक / रोल नंबर आणि पासवर्ड / जन्मतारीख तपशील भरा. यानंतर SBI प्रशिक्षणार्थी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल. उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी आणि भविष्यातील उपयोगासाठी हॉल तिकिट डाउनलोड करा आणि प्रिंट काढा एसबीआय प्रशिक्षणार्थी भरती प्रवेशपत्र २०२१ डाऊनलोज करण्यासाठी बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे. एसबीआय या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ६ हजार१०० पदांची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाईन लेखी परीक्षा, स्थानिक भाषा चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. प्रश्नपत्रिका द्विभाषिक असेल. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कापले जातील. २६ जुलै ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X1b6fJ
via nmkadda

0 Response to "एसबीआय अप्रेंटिस भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'असे' करा डाऊनलोड Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel