बदलत्या काळासोबत शिक्षकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे- पंतप्रधान Rojgar News

बदलत्या काळासोबत शिक्षकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे- पंतप्रधान Rojgar News

PM Modi on : बदलत्या काळासोबत आपल्या शिक्षकांना देखील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. यासाठी शिक्षण २.० हे महत्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या शिक्षक पर्वाच्या उद्घाटन समारंभाची औपचारिक सुरुवात झाली आहे. NEP २०२० अंतर्गत प्रस्तावित अनेक उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतरांच्या उपस्थितीत व्हर्चुअल माध्यमातून सुरू करण्यात आले. यामध्ये भारतीय सांकेतिक भाषा कोश (ISDL), बोलकी पुस्तके, CBSE ची शालेय गुणवत्ता आश्वासन आणि मूल्यांकन फ्रेमवर्क आणि शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम निष्ठा ३.० आणि विद्यांजली पोर्टल यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या शिक्षक पर्वाला संबोधित केले. देशभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह पालकांशी त्यांनी ऑनलाइन संवाद साधला. केंद्रीय शिक्षण मंत्रालय ७ ते १७ सप्टेंबर दरम्यान शिक्षा पर्व आयोजित करत आहे. या कार्यक्रमादरम्यान, शिक्षकांचे मोलाचे योगदान लक्षात ठेवले जात असून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पुढील स्तरावर नेण्यावर चर्चा केली गेली. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे यावेळी पंतप्रधानांनी अभिनंदन आणि कोतुक केले. पंतप्रधानांनी व्हर्चुअल माध्यम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षण आणि विद्यार्थ्यांना थेट संबोधित केले. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत पेज/हँडलवरून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर हे हा संवाद पाहता येणार आहे. शिक्षक पर्व २०२१ चा विषय पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केलेल्या अपडेटनुसार, २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्या शिक्षक पर्वाची थीम "गुणवत्ता आणि शाश्वत शाळा: भारतातील शाळांमधून ज्ञानप्राप्ती' ही आहे. बारा दिवस देशभरात साजरा केल्या जाणाऱ्या शिक्षक पर्वाच्या माध्यमातून सर्व स्तरावरील शिक्षणातील सातत्य सुनिश्चित करण्यासोबतच देशभरातील शाळांमध्ये गुणवत्ता, सर्वसमावेशक पद्धती आणि टिकाऊपणा अशा सुधारणेसाठी नाविन्यपूर्ण मार्गांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zToErP
via nmkadda

0 Response to "बदलत्या काळासोबत शिक्षकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे- पंतप्रधान Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel