Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-09-22T12:43:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, पदवीधर उमेदवारांना संधी Rojgar News

Advertisement
ONGC : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आालेआहे. या अंतर्गत एकूण ३१३ पदांची भरती केली जाणार आहे. पदासाठी ऑनलाइन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com वर जाऊन नोटिफिकेशन तपासू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार GATE 2020 गुणांद्वारे इंजिनीअरिंग आणि भू-विज्ञान विषयातील पदांसाठी अर्ज करू शकतात. १२ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. ओएनजीसीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, अनारक्षित आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आणि एईई (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी २८ वर्षे वयोमर्यादा आहे. या व्यतिरिक्त OBC साठी वयोमर्यादा ३३ वर्षे आणि AEE (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी ३१ वर्षे वयोमर्यादा आहे. SC/ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३५ वर्षे आणि AEE (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) साठी ३३ वर्षे वयोमर्यादा आहे. अर्ज शुल्क सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ३०० भरावे लागतील. SC/ ST/ PWBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी भरण्यात सवलत देण्यात आली आहे. 2021: असा करा अर्ज पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com वर जा. त्यानंतर करिअर टॅबवर क्लिक करा. 'GATE 2020 स्कोअरद्वारे इंजिनीअरिंग आणि भूविज्ञान विषयांमध्ये जीटीची भरती' च्या नवीन अर्जावर क्लिक करा. त्यानंतर GATE २०२० चा नोंदणी क्रमांक आणि ईमेल आयडी टाका. फोटो आणि सही अपलोड करा. अर्ज फी भरा. अर्ज स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट स्वत:कडे ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o0JpyG
via nmkadda