Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ११, २०२१ WIB
Last Updated 2021-09-11T08:43:44Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

करोना काळात ४ ते १८ वर्षातील ८० टक्के मुलांच्या शैक्षणिक स्तरात घसरण- सर्व्हे Rojgar News

Advertisement
Student Survey: काळात भारतात १४ ते १८ वर्षे वयोगटातील किमान ८० टक्के विद्यार्थ्यांचे शिकण्याचे प्रमाण कमी झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड (युनिसेफ) च्या अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. करोना काळात शाळा बंद राहिल्यामुळे दक्षिण आशियातील मुलांच्या शिकण्याच्या स्तरात घसरण झाली आहे. ५ ते १३ वयोगटातील ७६ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी दूरस्थ शिक्षणादरम्यान शिकण्याच्या पातळीत घट झाल्याची नोंद केली आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, दक्षिण आशियातील शाळा बंद झाल्याने लाखो मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांना ऑनलाइन माध्यमांची मदत घ्यावी लागली. कनेक्टिव्हिटी आणि उपकरणांची कमतरता असलेल्या ठिकाणच्या विद्यार्थ्यां शिक्षणामध्ये अडचणी आल्या. तांत्रिक सोयीसुविधा असल्या तरीही अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकले नाहीत असे युनिसेफचे दक्षिण आशियाचे संचालक जॉर्ज लारिया-एडझिक यांनी सांगितले. दूरस्थ शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शैक्षणिक स्तराला नुकसान पोहोचले. भारतामध्ये ६ ते १३ वर्षांदरम्यान ४२ टक्के विद्यार्थ्यांनी शाळा बंद असल्याने कोणत्याही प्रकारचे दूरस्थ शिक्षण न घेतल्याचे सर्व्हेक्षणादरम्यान सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी करोना काळात पुस्तके, वर्कशीट, फोन किंवा व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, व्हिडिओ क्लासेस यापैकी कशाचाही वापर केला नाही. तसेच विद्यार्थ्यांचा शाळेतील शिक्षकांशी फारच कमी संपर्क आला. अहवालानुसार, पाच ते १३ वर्षाच्या वयातील किमान ४२ टक्के विद्यार्थीी आणि १४ ते १८ वर्ष वयोगटातील २९ टक्के विद्यार्थी आपल्या शिक्षकांशी संपर्कात नव्हते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सरकारांने सुरक्षितपणे शाळा उघडण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन युनिसेफने केले आहे. मुलांना त्यांच्या आवश्यकतेनुसार दूरस्थ माध्यमाद्वारे शिक्षण मिळत आहे का याची खात्री करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. श्रीलंकेतील प्राथमिक शाळेतील ६९ टक्के मुलांचे शिकण्याचे प्रमाण कमी झाल्याचे मत त्यांच्या पालकांनी नोंदविले. तर पाकिस्तानमधील २३ टक्के लहान मुलांकडे दूरस्थ शिक्षणात मदत करू शकेल अशी कोणत्याही उपकरणांची सुविधा नाही असे युनिसेफच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 'शाळा मोठ्या काळासाठी बंद झाल्याने अनेक मुलांचा अभ्यास, सामाजिक संवाद आणि खेळांवर परिणाम झाला आहे. हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे' असे शाळा पुन्हा सुरू करण्याविषयी युनिसेफच्या इंडिया युनिटच्या प्रतिनिधी यास्मीन अली हक यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A8lOzm
via nmkadda