Advertisement
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. अधिकृत नोटीसमध्ये दोन यूआरएल किंवा वेब पत्ते दिले आहेत जे सारखे आहेत, परंतु ते काऊन्सिलशी संबंधित नाहीत. ने ज्या दोन URL चा उल्लेख केला आहे, त्या www.aictsd.com आणि www.aictetindia.org अशा आहेत. AICTE ने स्पष्ट केले आहे की संस्थेची अधिकृत वेबसाइट aicte-india.org आहे. एआयसीटीईने एका अधिकृत सूचनेद्वारे सावध केले आहे की जर कोणी व्यक्ती, समूहाने आर्थिक देवाणघेवाण किंवा कोणत्या अन्य उद्देशाने या बनावट वेबसाइटचा वापर केला तर हा व्यवहार ते आपल्या जोखमीवर करतील आणि एआयसीटीई कोणत्याही नुकसानकारक परिणामांची जबाबदारी घेणार नाही. ट्विटरवर अधिकृत सूचना आणि लिंक शेअर करताना, AICTE ने लिहिले आहे की, 'URL #AICTE ची अधिकृत वेबसाइट https://aicte-india.org सह सार्वजनिक सूचना.' ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ची अधिकृत वेबसाईट https://aicte-india.org URL आहे हे सामान्य जनतेच्या आणि भागधारकांनी लक्षात घ्यावे.. असे आढळून आले आहे की www.aictsd.com, www.aictetindia.org इत्यादी सारख्या URL असलेल्या काही वेबसाइट AICTE शी संबंधित नाहीत. एआयसीटीईची वेबसाइट काळजीपूर्वक तपासा आणि इतर कोणत्याही बनावट वेबसाइटवर लॉग इन करू नका, असा सल्ला परिषदेने दिला आहे. एआयसीटीईने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोला देखील वेबसाईटवर टॅग करून माहिती दिली आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ही एक राष्ट्रीय स्तराची परिषद आहे जी तांत्रिक शिक्षणाची देशातील शिखर संस्था आणि ती उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येते. आजच्या काळात बनावट वेबसाईटद्वारे फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. बर्याच वेळा लोक बनावट वेबसाइटला भेट देतात आणि फी भरतात आणि त्यांचे पैसे गमावतात. अशा परिस्थितीत, बनावट वेबसाइट्सपासून सावध राहण्याची गरज आहे आणि संपूर्ण तपासणी न करता कोणत्याही वेबसाइटला भेट देऊन पैसे देण्याचे टाळावे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lwvC04
via nmkadda