
उपयोजित गणिताला 'नियमित'ची समकक्षता Rojgar News
शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१
Comment

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता बारावीमध्ये हा विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रवेशासाठी नियमित गणित विषयानुसारच गुण गृहित धरून प्रवेश द्यावा, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने काढली आहे. यामुळे सीबीएसईच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने () इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोजित गणित हा विषय सुरू केला होता. या विषयाची लेखी परीक्षा ८० गुणांची, तर प्रात्यक्षिक परीक्षा २० गुणांची होते. हा विषय इतर विषयांना पर्यायी विषय म्हणून आणला आहे. यामुळे या विषयाला मुख्य विषय म्हणूनही गृहित धरावे आणि या विषयात मिळालेले गुण प्रवेश देताना विचारात घ्यावे, अशी सूचना आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी सर्व कुलगुरुंना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. गतवर्षी सीबीएसईने उपयोजित विज्ञान या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात केला होता. विद्यार्थ्यांमधील गणिताची कौशल्ये आणि ज्ञान वाढविण्याच्या दृष्टीने या विषयाचा समावेश करण्यात आला होता. याचा उपयोग समाजशास्त्र, कॉमर्स, फाइन आर्ट आणि जीवशास्त्र या क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो. मात्र काही विद्यापीठांनी पदवीचे प्रवेश देताना या विषयाचे गुण गृहित धरले जाणार नाहीत, असे सांगितले. यामुळे काही विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. याबाबत त्यांनी मंडळाकडे तक्रार केली होती. यानुसार मंडळाने आयोगाला पत्र लिहून सूचना देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आयोगाने हे पत्र काढून या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3luIJP6
via nmkadda
0 Response to "उपयोजित गणिताला 'नियमित'ची समकक्षता Rojgar News"
टिप्पणी पोस्ट करा