Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-09-16T06:43:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आरोग्य विभागात विविध पदांची भरती Rojgar News

Advertisement
संजय मोरे ० रिक्त पदांसाठी आवश्यक पात्रता - औषध निर्माता- पात्रता- बी.फार्मसी किंवा डी.फार्मसी - प्रयोगशाळा तंत्रज्ञ- पात्रता- बीएससी (विज्ञान) - आरोग्य सेवक- पात्रता- दहावी उत्तीर्ण. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव) - आरोग्य सेविका- पात्रता- सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंदणीसाठी पात्र. - आरोग्य पर्यवेक्षक- पात्रता- बीएससी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स. ० वयोमर्यादा खुला गट- १८ ते ३८ वर्षं (मागासवर्गीय- १८ ते ४३ वर्षं, अपंग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक- १८-४३ वर्षं) (आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी पदासाठी खुलागट ४५ वर्षांपर्यंत आणि आरोग्य सेविका पदासाठी खुलागट- ४० वर्षांपर्यंत अर्ज करण्यास पात्र आहेत.) ० अर्ज कसा करावा? सविस्तर सूचना www.maharddzp.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवार एकाच अर्जामध्ये पात्र असलेल्या सर्व पदांना अर्ज करू शकतो. (पदानुसार वेगळा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही). प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारलं जाईल. सर्व पदांसाठीची परीक्षा ही एकाच वेळी सर्वत्र घेण्यात येणार आहे. उमेदवारास प्रत्येक पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या जिल्हा परिषदेची निवड करावी लागेल. एकापेक्षा अधिक लॉगइन आयडीसह नोंदणी केली असेल तर उमेदवारांची पहिली यशस्वी नोंदणी ग्राह्य धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी ०७२९२००६३०५ वर संपर्क साधावा. ज्या उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षेकरिता एक किंवा एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांकरिता अर्ज सादर केले आहेत, त्यांना आता जिल्ह्याचा विकल्प देणं आवश्यक नाही. उमेदवारानं परीक्षेसाठी उपस्थित राहण्याकरता जिल्हा परिषदेचा विकल्प देणं आवश्यक आहे. याबाबत www.maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे उमेदवारास प्रवेशपत्र पाठवण्यात येईल. मार्च, २०१९च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरिता उमेदवारांना एक किंवा एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमधील एक किंवा अधिक संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्याची मुभा होती. तथापि, आता सरकारचे महापरिक्षा पोर्टल रद्द झाल्यानं सदरची आरोग्य विभागाशी संबंधित पदभरती ही OMR Vendor मार्फत Offline पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. त्यामुळे उपरोक्त पाच संवर्गाची परीक्षा राज्यात सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देता येणार आहे. तथापि पाच संवर्गांच्या पदभरती संदर्भात घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीच्या प्रत्येक संवर्गाची प्रश्नपत्रिका सर्व जिल्हा परिषदांसाठी संवर्गनिहाय सामायिक राहणार आहे. त्यामुळे २०१९च्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारानं एक किंवा एकापेक्षा अधिक संवर्गांच्या परीक्षेसाठी एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदेमधून अर्ज भरलेले आहेत, त्या उमेदवारांचे सर्व ठिकाणी भरलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. अशा उमेदवारांबाबत त्यानं प्रत्यक्ष एकाच जिल्हा परिषदे अंतर्गत आयोजित परीक्षेस उपस्थित राहून परीक्षा दिल्यानंतर सदर परीक्षेमध्ये त्याला प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे त्याने ज्या-ज्या जिल्हा परिषदेतून सदर पदभरतीसाठी अर्ज भरला आहे, त्या-त्या जिल्हा परिषदांच्या सदर पदांकरिताच्या तयार होणाऱ्या गुणवत्ता (प्रवर्गनिहाय) यादीमध्ये त्याचं नाव गुणवत्ता क्रमांकानुसार अंतर्भूत केले जाईल. दिव्यांग आणि खुल्या प्रवर्गातील पदांसाठी ऑनलाइन अर्ज www.maharddzp.com या वेबसाइटवर करण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर, २०२१ आहे. परीक्षेचं आयोजन १६ आणि १७ ऑक्टोबर, २०२१ रोजी करण्यात आलं आहे. परीक्षा प्रवेशपत्र ६ ते १५ ऑक्टोबरपर्यंत डाऊनलोड करता येतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Em6xxg
via nmkadda