सर्व इयत्तांच्या सरसकट शाळा सुरू करा; शिक्षक आणि मुख्याध्यापकांची मागणी Rojgar News

सर्व इयत्तांच्या सरसकट शाळा सुरू करा; शिक्षक आणि मुख्याध्यापकांची मागणी Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरी भागात केवळ आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, असे वर्गीकरण न करता सरसकट पहिलीपासून शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून केली जात आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे शाळा सुरू नसल्याने मोठे नुकसान होत असून, या विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्याची संधी मिळायला हवी, अशी भूमिका आता शिक्षण क्षेत्रातून मांडण्यात आली आहे. चार ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात येणार असून, ग्रामीण भागात ५ वी ते १२वीच्या शाळा सुरू होणार आहेत. पण, शहरी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या मुलांचे काय?, त्यांनी घरीच बसून शिक्षण घ्यायचे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदा शहरी भागामध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश घेतलेले विद्यार्थी पहिल्यांदाच शाळेत जाणार आहेत. या मुलांना शाळेत जाण्याची उत्सुकता आहे. असे असताना त्यांच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. पहिलीतील मुलांना जर शाळा काय असते, हेच कळले नाही, तर त्यांना शाळेची गोडी कशी निर्माण होणार, असा प्रश्न सरकारला विचारला जात असून, त्यावर उत्तर मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात सरसकट शाळा सुरू झाल्यातर प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्याचे मूल्यमापन करता येणे शक्य होणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास घेता येणे शक्य असून, शिक्षकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागणार आहे. या दोन्ही पद्धतींनी शिकवताना शहरी आणि ग्रामीण भागातील शिक्षकांची तारांबळ उडणार असून, शाळा सुरू करतानाच सर्व इयत्तांच्या शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी मुख्याध्यापकांकडून केली जात आहे. कोणताही शास्त्रीय आधार नाही राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना केवळ पाचवी ते बारावी या इयत्ता निवडल्याला काही शास्त्रीय आधार आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. पहिली ते चौथीचे विद्यार्थी जर शाळेत गेले, तर त्यांना करोनाचा अधिक धोका आहे, असे काही आहे का, हे सरकारने स्पष्ट करावे आणि त्याबाबतची भूमिका मांडावी, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. करोनासंदर्भात कार्यरत असलेल्या टास्क फोर्सने विशिष्ट वयोगटाला करोनापासून धोका आहे, असे कुठेही म्हटलेले नाही. खरेतर जे विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून शाळेतच गेलेले नाहीत, अशा लहान विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची गरज आहे. असे असतानाही पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची परवानगी देणे अशास्त्रीय आहे. असे झाले, तर पुन्हा या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. - महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित -- कधीही शाळेत न गेलेली आणि यंदा प्रवेश घेतलेली मुले शाळा कधी पाहणार? -- शिक्षकांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण कसे द्यायचे? -- विशिष्ट वयोगटाने करोनापासून सावधान रहावे, असे टास्क फोर्सने सांगितले आहे का? --शाळेत न येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे?


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ojy50Z
via nmkadda

0 Response to "सर्व इयत्तांच्या सरसकट शाळा सुरू करा; शिक्षक आणि मुख्याध्यापकांची मागणी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel