Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-27T08:43:53Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

शाळांची घंटा वाजताना शिक्षकांना निवडणूक ड्युटी Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : तब्बल दीड वर्षांनी प्रत्यक्ष शाळांची घंटा वाजणार असतानाच (Schools Reopening), शिक्षकांना आता निवडणुकीची कामे लावल्याचे समोर येत आहे. याचबरोबर जे यापूर्वीच निवडणूक ड्युटी करत आहेत, त्यांना शाळांमध्ये परत न पाठवता त्यांचीही इतर कार्यालयात बदली करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी आहे. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार, शिक्षकांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी निवडणुकीचे काम दिले जाऊ शकते. मात्र असा नियम असतानाही, निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या तयार करण्याच्या कामाला शिक्षकांना जुंपले जाते. या कामासाठी गेल्या दोन वर्षांपासून शहरातील अतिरिक्त शिक्षक देण्यात आले आहेत. या शिक्षकांची 'बीएलओ' या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, नुकतीच १६६ अंधेरी पूर्व येथील विधानसभा मतदारसंघात काम करणाऱ्या ५० हून अधिक शिक्षकांची वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम येथे बदली करण्यात आली आहे. हे शिक्षक निवडणूक आयोगाचे कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत, त्यामुळे त्यांची अशी बदली करणे चुकीचे आहे. आता अंधेरी पूर्व कार्यालयात गरज नसेल, तर या शिक्षकांना पुन्हा शाळेत पाठवावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे. मुंबईतील अतिरिक्त शिक्षक सन २०१९ पासून रोज 'बीएलओ' ड्युटी करत आहेत. त्यांना शिक्षक म्हणून असलेल्या हक्काच्या रजा, प्रवास भत्ता आदी कोणत्याही सुविधा नसतानाही करोनाकाळात ही कामे सुरू होती. त्यावेळी अत्यंत मेहनतीने या शिक्षकांनी कामे पूर्ण केली. त्यानंतरही मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी या शिक्षकांची बदली दुसऱ्या वॉर्डमध्ये केली, असे शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले. ही मनमानी असून उर्वरित मतदारसंघातील कामे पूर्ण झाली नसतील, तर तेथे शिक्षकांची नियुक्ती करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. आता महापालिकेची निवडणूक आहे, तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या कामावर घ्या, त्यासाठी खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकच का, असा प्रश्नही या शिक्षकांनी उपस्थित केला आहे. 'बदलीच्या ठिकाणी जाणार नाही' यातील काही शिक्षक रिक्त जागेवर शाळेत जाण्यासाठी तयार असूनही दोन वर्षांपासून त्यांची सुटका होत नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांचीच पोलिसांनी उलट चौकशी केल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन वर्षे सतत राष्ट्रीय काम करणाऱ्या शिक्षकांची बदली करू नये, अशी मागणी दराडे यांनी केली आहे. या सर्व शिक्षकांनी हे आदेश स्वीकारले नसून बदली ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oaXqtN
via nmkadda