भारत सरकारच्या आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती Rojgar News

भारत सरकारच्या आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती Rojgar News

THST Recruitment 2021: अनुवादित आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था () यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, वयोमर्यादा याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ट्रान्स्लेट हेल्थ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेच्या प्रशासकीय विभागाअंतर्गत एकूण ७ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्रयोगशाळा व्यवस्थापक (Lab Manger), कनिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (Juinior Research Scientist), वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant), तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant), क्षेत्र कार्यकर्ता (Field Worker) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्रयोगशाळा व्यवस्थापक (Lab Manger) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून लाइफ सायन्स, बायोटेक्नोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रो बायोलॉजी विषयात पीएचडी असणे गरजेचे आहे. संबधित क्षेत्रातील पोस्ट पीचएडीचा ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी ४५ वर्षे वयोमर्यादा असून १ लाखपर्यंत पगार दिला जाणार आहे. कनिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (Juinior Research Scientist) पदासाठी उमेदवाराकडे लाइफ सायन्स आणि त्या समकक्ष विषयातून पीएचडी असणे गरजेचे आहे. पोस्ट पीएचडीचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी ३५ वर्षे वयोमर्यादा असून ७५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाइफ सायन्समधून बीएससी आणि संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा पदव्युत्तर अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी ४० वर्षांची वयोमर्यादा असून ५२ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून बीएससी किंवा ३ वर्षांचा इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. या पदासाठी ५० वर्षांपर्यंतची वयोमर्यादा असून २० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. क्षेत्र कार्यकर्ता (Field Worker)या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे. यासाठी ५० वर्षे वयोमर्यादा असून १८ हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी किंवा ३ वर्षांचा इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. या पदासाठी ५० वर्षे वयोमर्यादा असून २० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज पाठवायचा आहे. ट्रान्स्लेट हेल्थ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन अर्ज भरायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kIDQTA
via nmkadda

0 Response to "भारत सरकारच्या आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel