Advertisement
anti-terrorism course: नवीन दहशतवादविरोधी अभ्यासक्रमाची शैक्षणिक गुणवत्ता लक्षात न घेता अनावश्यक वाद निर्माण केला जात आहे असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे () कुलगुरू एम.जगदेश कुमार यांनी म्हटले आहे. विद्यापीठात शिकणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकवण्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा एक गट विरोध करत आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी हे विधान केले आहे. 'भारताच्या शेजारील देशांमध्ये ज्या प्रकारे गोष्टी घडत आहेत, त्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे सिद्ध होत आहे. अशावेळी जेएनयूसारख्या शैक्षणिक संस्थेने पुढाकार घेऊन दहशतवादविरोधी तज्ञांचा एक चांगला गट तयार करणे आवश्यक आहे', असे कुलगुरुंनी यावेळी म्हटले. हा अभ्यासक्रम सर्वांगीण आहे हे स्पष्ट करताना कुलगुरू म्हणाले की, 'यात प्रमुख्याने दहशतवादविरुद्ध सहकार्याची भूमिका, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक प्रयत्नांचा समावेश असेल.' 'या अभ्यासक्रमातून कोणत्याही समुदायाला लक्ष्य करण्यात आले नाही. हा पूर्णपणे शैक्षणिक अभ्यासक्रम आहे. जेएनयूने २०१८ मध्ये ड्युअल डिग्री प्रोग्रामसह स्कूल ऑफ इंजिनीअरिंगची स्थापना केली होती.' असे दहशतवादविरोधी अभ्यासक्रमाची रचना करणारे जेएनयूचे प्राध्यापक अरविंद कुमार यांनी सांगितले. 'विद्यार्थी पहिल्या चार वर्षांत इंजिनीअरिंग विषयांचा अभ्यास करतात. त्यांच्या पदवीसाठी आणि पाचव्या वर्षी ते मानवता, सामाजिक विज्ञान, भाषा, आंतरराष्ट्रीय संबंध, व्यवस्थापन, विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये एक वर्षाच्या पदव्युत्तर पदवीसाठी (MS)अभ्यास असतो,'असे कुलगुरूंनी यावेळी सांगितले. 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार हा अभ्यासक्रम आहे. आहे, विद्यार्थ्यांना समग्र आणि बहु-अनुशासनात्मक शिक्षण देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. जेएनयू शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एका विभागाने कोर्स सुरू करण्यास आक्षेप घेतला आणि "जिहादी दहशतवाद" हा "कट्टरतावादी-धार्मिक दहशतवादा" चा एकमेव प्रकार असल्याचा आरोप लावल्याचेही कुलगुरू म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WMPovU
via nmkadda