Advertisement
Dr Homi Bhabha state : मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. डॉ. होमी भाभा विद्यापीठातून विद्यार्थ्यांना १० नवे अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१ पासून या अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे. अनेक कौशल्याधिष्ट नवीन अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे. हे अभ्यासक्रम विना अनुदानित तत्वावर सुरु होणार आहेत. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठातर्फे यासंदर्भात माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. वेगवेगळ्या विषयामध्ये एमए, एमएससी, बीएससी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा फायदा होणार आहे. तसेच भविष्यात नोकरी मिळण्यासाठी देखील हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहेत. नव्या अभ्यासक्रमांची यादी एमए जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन (मराठी) एमए इंग्लिश एमएससी (आयटी) एमएससी (बायोइन्फोर्मेटीक्स) एमएससी (इंडस्ट्रीयल बायोटेक्नोलॉजी) एमएससी (इंडस्ट्रीयल सायन्स) बीएससी (डेटा सायन्स) बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन बॅचलर ऑफ स्पोर्ट मॅनेजमेंट होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१ पासून हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. हे अभ्यासक्रम रोजगारक्षम आहेत. महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम शिकविणारे सर्व तज्ञ शिक्षक आणि तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळेल असे डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्रो. विजय मेंदुळकर यांनी म्हटले आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी उपल्ब्ध होणार आहेत. म्हणून या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. स्वाती वाव्हळ यांनी केले आहे. होमी भाभा विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CjkZo8
via nmkadda