Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-04T07:43:57Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पुणे विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये वाढ Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे एकीकडे राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेश घटत असताना, सावित्रीबाई फुले ांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पुणे, नाशिक, नगर आणि सिल्वासा या भागात अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २१ हजारांनी वाढली आहे. गेल्या वर्षी अभियांत्रिकी विद्याशाखेत सर्वाधिक म्हणजेच ५४ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संकलित केलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. २०१२ या शैक्षणिक वर्षापासून विचार केला, तर अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत चालली होती. २०१२ ते २०१८ या काळात अभियांत्रिकी प्रवेश ४४ हजारांवरून घसरून ३३ हजारांपर्यंत आले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा एकदा वाढली असून, आतापर्यंतचे विक्रमी प्रवेश २०२० या शैक्षणिक वर्षामध्ये झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर होती. अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी देणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनेही (एआयसीटीई) अभियांत्रिकीसाठी परवानगी देण्याचे बंद केले. आता मात्र, हे चित्र बदलत असून, अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीमधील पारंपरिक अभ्यासक्रमांव्यतिरीक्त काही नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असल्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या प्राध्यापकांकडून सांगण्यात येत आहे. व्यवस्थापन शाखेतही प्रवेश वाढले अभियांत्रिकीप्रमाणेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या व्यवस्थापन विद्याशाखेच्या महाविद्यालयांमध्येही प्रवेश वाढले असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या प्रवेशांमध्ये साधारण दोन हजारांहून अधिक प्रवेशांची वाढ झाली आहे. एमबीए, एमसीए अशा अभ्यासक्रमांमध्ये नावीन्यता आणली जात असल्याने हे चित्र निर्माण झाले असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, आयओटी अशा नवीन विषयांची भर पडली आहे. या मुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांकडे कल वाढला आहे. यामुळे प्रवेशांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या शिवाय अभ्यासक्रमात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे आणि अधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणामुळे प्रवेश संख्या वाढत आहेत. - एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38F0oxD
via nmkadda