Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-24T14:43:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना शिक्षक आणि पालकांना 'या' नियमांचे पालन करावे लागणार Rojgar News

Advertisement
School Reopen: राज्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळेचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासोबतच टास्कफोर्सने शाळा सुरु करताना काही सूचना केल्या आहे. शिक्षणविभागातर्फे या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळीज घेण्याची सुचना शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षा या गोष्टींना प्राधान्य देण्यात यावे यांचा पुर्नउच्चार शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला. शाळा सुरु करताना पालकांची मंजुरी आवश्यक आहे. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लसीकरण सक्तीचे आहे. कोरोना संसर्गाच्या पाश्वभुमीवर मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या सुचनाचे पालन सर्वांनाच करावे लागणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. शिक्षणविभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे शाळांमध्ये क्लिनिक प्रत्येक शाळेने शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक सुरु करावे. नियमितपण विद्यार्थ्यांचे तापमान तपासावे. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकांची मदत घ्यावी. या कामासाठी CSR किंवा स्थानिक निधीतून खर्च करावा अशी सूचना करण्यात आली आहे. शाळेत घ्यायची काळजी मुलांनी शाळेत पायी येण्यास शिक्षकांनी प्रोत्साहित करावे. ज्या शाळांमध्ये स्कूलबस किंवा खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात तिथे एका सीटवर एक विद्यार्थी अशी आसन व्यवस्था असावी. विद्यार्थी बसमध्ये चढताना/उतरताना त्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगावे. चालक/वाहकांनी विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहित करावे. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी जेवण आणि इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात. विद्यार्थ्यांना गृहपाठ ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात यावेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वह्यापुस्तकांची अदलाबदल होणार नाही. वेळ असेल तर गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करुन घ्यावा. खेळाच्या मैदानाबाबत सद्य स्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ खेळण्यास शिक्षणविभागाने परवानगी दिली नाही. परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर खेळ घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. खेळाचे साहित्य नियमित सॅनिटाईज करावे. थकलेल्या आणि दमलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्क असावा आणि त्यांच्यामध्ये २ मीटरचे अंतर असावे अशी सूचना देण्यात आली आहे. आजारी विद्यार्थी शोधणे ताप, सर्दी, जोरात श्वासोच्छवास करणारे, शरीरावर ओरखडे, डोळे लाल झालेले, ओठ फुटलेले आणि लाल झालेले, बोटे, हात, सांधे सुजलेले, उलट्या, जुलाब आणि पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात आल्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था करणयाची सूचना देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kEnfjI
via nmkadda