Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-04T05:43:47Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

६ हजारहून अधिक प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी जाहिरात द्या-केंद्रीय शिक्षणमंत्री Rojgar News

Advertisement
meeting with VCs: सर्व विद्यापीठांनी आरक्षित प्रवर्गातील रिक्त अध्यापन पदे भरण्यासाठी पुढील आठवड्यात जाहिराती द्याव्यात असे निर्देश केंद्रीय धर्मेंद्र प्रधान यांनी दिले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशभरातील ४५ केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत एका महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. 'मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची एकूण ६ हजार २२९ पदे रिक्त आहेत. त्यापैकी एससीसाठी १०१२, एसटीसाठी ५९२, इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) १७६७, ईडब्ल्यूएससाठी ८०५ आणि दिव्यांग श्रेणीसाठी ३५० जागा रिक्त आहेत. उर्वरित पदे ही सामान्य श्रेणीतील पदे आहेत. 'सप्टेंबर महिना हा एक प्रकारचा शिक्षक महोत्सव आहे. राष्ट्रपती ५ सप्टेंबरला राष्ट्राला संबोधित करतील आणि नंतर पंतप्रधान ७ सप्टेंबरला संबोधित करतील. आपण सर्वजण मिशन मोडमध्ये एकत्र काम करुन या ६ हजारहून अधिक रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न करुया असे शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरुंना सांगितले. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही पदे भरण्याचा प्रयत्न करू. यासाठी सर्व संस्थांनी ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान जाहिराती द्याव्यात, तरच ही योजना यशस्वी होईल असेही ते म्हणाले. NEP लागू करण्यासाठी धोरण बनवा या बैठकीमध्ये उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्याच्या स्टेप्सविषयी चर्चा झाली. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरूंना सांगितले, ' NEP ची अंमलबजावणी कशी कराल याबद्दल तुम्हाला स्वायत्तता आहे. येत्या शैक्षणिक सत्राबद्दल सर्व विद्यापीठांनी आपापली रणनिती आखावी असेही ते पुढे म्हणाले. इतर महत्वाचे मुद्दे शैक्षणिक सत्राबाबत शिक्षणमंत्री म्हणाले की, विद्यापीठांनी प्रवेश, परीक्षा आणि निकालांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आणि मल्टीपल एंट्री-एक्झिट सिस्टमसाठी फ्रेमवर्क तयार करण्याची कुलगुरूंना स्वायत्तता आहे. या शैक्षणिक वर्षात म्हणजे २०२१ मध्ये त्यांनी ते करावे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यासाठी देशभरातील ४५ केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. व्हर्च्युअल माध्यमातून झालेल्या बैठकीत नवीन शैक्षणिक सत्र २०२१-२२ सुरु करण्याची तारीख आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कोट्यातील प्राध्यापकांची पदे भरण्याचा निर्णय घ्यावा असे नोटिफिकेशन जाहीर केले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी गेल्या महिन्यात देशभरातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत बैठका घेतल्या होत्या. परंतु एकत्रितपणे ही पहिली औपचारिक बैठक होती. ४५ केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्यामध्ये अॅकेडेमिक बँक ऑफ क्रेडिट, अभ्यासक्रमांदरम्यान मल्टीपल एन्ट्री-एक्झिट, ओपन आणि ऑनलाईन शिक्षण, शैक्षणिक संस्थांचे अनुदान, शैक्षणिक सत्र २०२१ सुरू होण्याची तारीख, आरक्षित प्रवर्गातील रिक्त अध्यापन पदे भरण्याच्या स्टेप्स आणि 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' समारोपाचे आयोजन या विषयांचा सहभाग होता. पुढील सत्रापासून DU मध्ये NEP देशाच्या प्रमुख केंद्रीय विद्यापीठांपैकी एक असलेल्या दिल्ली विद्यापीठाने या आठवड्यात ३१ ऑगस्ट २०२१ झालेल्या बैठकीत पुढील शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पुढील सत्रापासून ४ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tcZbHg
via nmkadda