सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच यंदापासून: उदय सामंत Rojgar News

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच यंदापासून: उदय सामंत Rojgar News

सिंधुदुर्गवासियांसाठी विशेषत: तेथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील पहिल्याच अशा वैद्यकीय महाविद्यालयात (first government ) याच वर्षीपासून अभ्यासक्रम सुरू होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १०० विद्यार्थ्याची पहिली बॅच यंदापासून सुरू होणार आहे. याबाबत माहिती देताना उदय सामंत म्हणाले, 'सिंधुदुर्गात शासकीय महाविद्यालय सुरू व्हावं की कोकणवासियांची गेले ३० ते ३५ वर्षांपासूनची इच्छा होती. ९९६ कोटी रुपयांच्या योजनेतून वैद्यकीय महाविद्यालयाचं काम सुरू झालं. त्यानंतर यावर्षी प्रवेश होणार की ना अशी टिप्पणीही सुरू झाली. पण मला सांगताना आनंद होत आहे की कोकणातील शैक्षणिक विकासाचं एक नवं दालन यावर्षीपासून सुरू होत आहे. १०० विद्यार्थ्यांचे मेडिकल कॉलेजचे अॅडमिशन यंदापासून करत आहोत आणि यासाठी मेडिकलच्या शिखर संस्थेने आजच परवानगी दिली आहे.' या महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य सोयीसुविधांवर स्थानिक प्रशासनाचं काम सुरू आहे. हे मेडिकल कॉलेज आणि चिपी विमानतळ या दोन्ही गोष्टी यंदापासून होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली. अलिबाग मेडिकल कॉलेजला देखील शिखर संस्थेने परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे कोविड-१९ चं कुठलंही कारण न देता ही विकासकामे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत, असंही सामंत म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nV9xv3
via nmkadda

0 Response to "सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच यंदापासून: उदय सामंत Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel