Advertisement
Delhi School : विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच स्वावलंबी बनवण्यासाठी दिल्ली सरकारने एक अनोखा पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या अकरावी आणि बारावीच्या मुलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उद्योजक होण्यासाठी छोटी रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष २०१९ मध्ये सुरू झालेल्या अभ्यासक्रमासाठी यंदा रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत, दिल्ली सरकार आता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये देणार आहे. कोणत्याही मुलाने नोकरी मिळविण्यासाठी शाळेत जाऊ नये तर इतरांना नोकरी उपलब्ध करण्याच्या उद्धीष्टाने शाळेत जावे या हेतूने दिल्ली सरकारने दोन वर्षांपूर्वी उद्योजकता अभ्यासक्रम सुरू केल्याची माहिती दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Education Minister Manish Sisodia)यांनी दिली. आपण जे काम करु ते उद्योजक मानसिकतेने (entrepreneurship mindset)करु हा विश्वास मुलांमध्ये निर्माण व्हायला हवा. सुरुवातीला विद्यार्थ्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी १ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली होती असे सिसोदिया म्हणाले. अकरावी आणि बारावीच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पात जाहीर केलेली रक्कम वाढवून २ हजार इतकी केली जाईल. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या उद्योजकता मानसिकता अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दिल्ली सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मान्यताप्राप्त व्यावसायिक कल्पनांसाठी १ हजार सीड मनी देण्यात आली होती. यावर्षी मार्चमध्ये दिल्ली सरकारने ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया म्हणाले. ही योजना सुरू करण्यापूर्वी दिल्ली सरकारने काही शाळांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची सुरुवात केली. यामध्ये विद्यार्थ्यांची आवड पाहून आता ही संकल्पना पुढे सुरु ठेवण्यात आली आहे. सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DMN3lc
via nmkadda