Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २१, २०२१ WIB
Last Updated 2021-09-21T07:43:25Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत ११ जिल्ह्यांमध्ये भरती Rojgar News

Advertisement
Vidarbha Irrigation Development Corporation Recruitment: विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत ११ जिल्ह्यांमध्ये वकिल पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी महामंडळातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील जाहीरातीमध्ये देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये भरती विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, सिंचनभवन नागपूर कार्यालयाकडून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये भरती केली जाणार आहे. या जिल्ह्यातील दिवाणी न्यायायल, मोटार अपघात न्यायाधिकरण, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर, महाराष्ट्र भुमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनरस्थापना प्राधिकरण नागपूर आणि उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथील वकीलांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याचा नमुना जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. त्यानुसारच उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे. या पदभरतीच्या पात्रता निकषांची माहिती महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. ऑनलाइन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पदभरतीसंदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. भरतीसंदर्भातील सर्व सूचना वेबसाइटवर देण्यात येतील. महामंडळाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या पॅनलमधील इच्छुक उमेदवारांनीदेखील नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. नवे पॅनल कार्यरत झाल्यावर आधीचे पॅनल आपोआप बरखास्त झाले असे गृहीत धरण्यात येईल. अर्जाची शेवटची तारीख विविध ठिकाणच्या न्यायालयात न्यायालयीन प्रकरणे चालविण्याकरिता वकीलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी २० सप्टेंबर २०२१ ते ११ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत edvid@gmail.com वर अर्ज करायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VYCUB1
via nmkadda