जेईई मेन परीक्षेचा निकाल लांबणार Rojgar News

जेईई मेन परीक्षेचा निकाल लांबणार Rojgar News

JEE Main Session 4 : जेईई मुख्य परीक्षेच्या निकालास उशीर झाला आहे. अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आली आहे. आयआयटी खरगपूरने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ११ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू होणार होती. पण नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA)कडून सत्र -४ साठी जेईई मेनच्या निकालास उशीर झाल्यामुळे संस्थेने वेळापत्रकही बदलले आहे . उमेदवारांना चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या निकालासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकता. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागणार आहे. पुढील स्टेप्सद्वारे पाहता येईल २०२१ निकाल इंजीनियरिंग प्रवेश परीक्षत सहभागी झालेल्या उमेदवारांनी आपला जेईई मेन निकाल पाहण्यासाठी या निकालाची घोषणा झाल्यानंतर अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. त्यानंतर होमपेजवर उपलब्ध केल्या जाणाऱ्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर नव्या पेजवर उमेदवारांना आपले लॉगइन डिटेल्स भरून सबमिट करावे लागेल. यानंतर आपला जेईई मेन २०२१ स्कोअर उमेदवारांना पाहता येईल. कॅटेगरी आणि ओव्हरऑल रँकदेखील पाहता येणार आहे. जेईई मेन निकाल २०२१ च्या घोषणेनंतर उमेदवार परीक्षा पोर्टल वर लॉग-इन करून आपला जेईई मेन २०१२ निकाल, कॅटेगरी रँग आणि ओव्हरऑल रँक आदी माहिती घेऊ शकणार आहेत. जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (मेन), २०२१ च्या निकालांची घोषणा अधिकृत पोर्टल, jeemain.nta.nic.in वर करणार आहे. जेईई मेन २०२१ परीक्षेत सहभागी उमेदवारांनी निकालासाठी पोर्टलला भेट देत राहावी. इंजिनीयरिंग मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या आणि देशातील प्रतिष्ठित संस्था आयआयटीत प्रवेश व्हावा असे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना जेईई मेन नंतर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा द्यावी लागते. यावर्षी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन ३ ऑक्टोबर २०२१ रोजी केले जाणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया ११ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होणार. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी जेईई मेन परीक्षेत पात्र ठरलेले पहिले अडीच लाख यशस्वी उमेदवारच नोंदणी करू शकतात. एनटीए द्वारे अधिकृतपणे निकालाची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. उमेदवारांनी ताज्या माहितीसाठी पोर्टलवर लक्ष ठेवावे असे सांगण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hn5ljm
via nmkadda

0 Response to "जेईई मेन परीक्षेचा निकाल लांबणार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel