Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-09-22T11:43:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

इंडियन ऑईल लिमिटेडमध्ये बंपर भरती, अर्ज प्रक्रियेला सुरुवात Rojgar News

Advertisement
IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह पदासाठी बंपर भरती करण्यात येत आहे. या भरतीद्वारे एकूण ५१३ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा असेल त्यांना इंडियन ऑईलची अधिकृत वेबसाइट iocl.com वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने २१ सप्टेंबर २०२१ पासून रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये () अर्ज करण्यासाठी उमेवारांना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्याचदिवशी ही फी जमा करण्याची शेवटची तारीख देखील आहे. या रिक्त पदासाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी डाउनलोड करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. या भरीतीसाठी २४ ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. या पदांवर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iocl.com वर उपलब्ध अधिसूचना तपासणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनुसार, नॉन-एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट iocl.com वर जावे. वेबसाइटच्या होमपेजवर न्यू जॉब ओपनिंगच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर Requirement of Experienced Non-Executive Personnel- 2021 in IOCL, Refineries Division च्या लिंकवर क्लिक करा. ऑनलाईन अर्जाच्या लिंकवर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. मागितलेला तपशील भरून नोंदणी केल्यानंतर उमेदवार अर्ज भरू शकतात. पात्रता ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बीएससी पदवीचा १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे पीसीएममध्ये आयटीआय प्रमाणपत्र किंवा बीएससी पदवी असावी. ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट पदासाठी, बीएससी पदवी आणि १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तर ज्युनिअर नर्सिंग असिस्टंट पदासाठी बीएससी नर्सिंग किंवा डिप्लोमा इन नर्सिंग असणे गरजेचे आहे. केवळ १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार देखील अर्ज करु शकतात. वयोमर्यादा जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि २६ वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षण असलेल्या उमेदवारांना इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u1yLbQ
via nmkadda