इंटर्नशिप पदवी अभ्यासक्रमांना प्रोत्साहन द्या, यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश Rojgar News

इंटर्नशिप पदवी अभ्यासक्रमांना प्रोत्साहन द्या, यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश Rojgar News

Internship degree programs: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठ आणि इतर उच्च शिक्षण संस्थांना अॅप्रेंटिसशिप/इंटर्नशिप पदवी अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. उच्च शिक्षण संस्थांना विद्यापीठांद्वारे देण्यात येणाऱ्या सामान्य पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षणार्थी/इंटर्नशिप पदवी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यास सांगितले आहे. '२०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय घोषणेच्या अनुषंगाने आणि नवीन पदवीधरांना आवश्यक ज्ञान, क्षमता आणि दृष्टीकोनासह रोजगारासाठी तयार करण्याच्या दृष्टीने यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांमध्ये अॅप्रेंटिसशिप अभ्यासक्रमांचे दिशानिर्देश बनविले. विद्यापीठांद्वारे तयार केलेल्या सामान्य पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षणार्थी/इंटर्नशिप समाविष्ट करण्यासाठी इंटर्नशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे', असे अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे. विद्यापीठांमार्फत प्रशिक्षणार्थी/इंटर्नशिप एम्बेडेड पदवी अभ्यासक्रम घेण्यात येत असतील तर संबंधित माहिती गुगल फॉर्मच्या माध्यमातून सादर करा असे यूजीसीने म्हटले आहे. यूजीसीने शेअर केलेल्या अधिकृत नोटिसवर गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध आहे. १० ऑक्टोबर २०२१ ही माहिती सादर करण्याची शेवटची तारीख आहे. विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता वाढविण्यासाठी २०२०-२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अॅप्रेंटिसशिप-एम्बेडेड पदवी आणि डिप्लोमा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला. माजी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी ऑगस्टमध्ये इंटर्नशिप-एम्बेडेड पदवी अभ्यासक्रमासाठी यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. 'विद्यार्थ्यांसोबत भेदभाव नको' महाविद्यालयांना विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या जातीय भेदभावासंबंधी यूजीसीने महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. कोणताही कर्मचारी किंवा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये जातीच्या आधारे भेदभाव करणार नाही याची खात्री करा असे निर्देश यूजीसीने दिले आहेत. आयोगाने विद्यापीठांकडून जात-आधारित भेदभावाच्या तक्रारी आणि त्यांच्या संबंधात २०२०-२१ दरम्यान केलेल्या कारवाईची माहिती मागितली आहे. 'कर्मचारी आणि शिक्षकांनी सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये. कोणताही कर्मचारी आणि शिक्षक कोणत्याही समुदायाशी किंवा कोणत्याही वर्गाच्या विद्यार्थ्यांशी भेदभाव करत नाही, याची विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी खात्री करायला हवी' असे विद्यापीठांच्या कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात, यूजीसी सचिव रजनीश जैन म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ECN5wv
via nmkadda

0 Response to "इंटर्नशिप पदवी अभ्यासक्रमांना प्रोत्साहन द्या, यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel