Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-09-16T14:43:51Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बारावीच्या 'त्या' विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी नंतर देता येणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती Rojgar News

Advertisement
MHT CET 2021: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल (Maharashtra Cell)ने परीक्षा २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. ही परीक्षा देताना बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांना अडचण येणार होती. पण शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. एमएचटी-सीईटी-२०२१ (अभियांत्रिकी,तंत्रज्ञान आणि कृषी शिक्षण) ही परीक्षा २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार आहे. यावेळी अनेक उमेदवारांची बारावीची गुण सुधारणा परीक्षा/समकक्ष परीक्षा देखील येत आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करून देण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. संबंधित उमेदवारांनी दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र, मोबाईल क्रमांकासह महत्वाचा तपशील सीईटी कक्षाचा अधिकृत ईमेल आयडी technical.cetcell@gmail.com वर पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशपत्र जाहीर महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स सेलने पीसीएम किंवा इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेसाठी (PCM or Engineering entrance examination) प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. बीटेक,बीई अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २०२१ (Maharashtra Common Entrance Test Cell)ही २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आयोजित केली जाणार आहे. तसेच यूजी प्रवेश परीक्षेसाठी प्रत्येकवर्षी ५ लाखहून अधिक विद्यार्थी नोंदणी करतात. बीटेक आणि बीई प्रोगामसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती भरावी लागेल. याव्यतिरिक्त या वृत्तात पुढे दिलेल्या पद्धतीने देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील. MHT CET प्रवेशपत्र २०२१ असे डाऊनलोड करा B.Tech आणि BE परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रथम Mhtcet2021.mahacet.org ला भेट द्या. त्यानंतर 'Download' विभागाच्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा इतर तपशीलांसह लॉगिन करा. प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या. उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंटआउट आणि सूचनांमध्ये नमूद केलेली इतर कागदपत्रे परीक्षा केंद्रावर आणणे आवश्यक आहे. यामध्ये, फोटो आयडी ओळखपत्रासाठी दिलेल्या पर्यायांपैकी एक उमेदवारांना सोबत बाळगायचे आहे. या व्यतिरिक्त, उमेदवारांनी लक्षात घ्यावे की प्रवेशपत्रात परीक्षेचे शहर, केंद्र, रोल नंबर इत्यादी तपशील असतील. ते नीट तपासा. यावर्षी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम आणि कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकार सामान्य प्रवेश परीक्षा (CET) घेतलेली नाही. हे प्रवेश बारावीच्या गुणांच्या आधारे होणार आहेत. महाराष्ट्र सीईटी सेलने एमएएच एमबीए सीईटी २०२१, एमएएच एमएमएस सीईटी २०२१, एमसीए सीईटी २०२१ यासह काही सीईटींसाठी आधीच प्रवेशपत्र जारी केले आहे. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Xtp0r6
via nmkadda