Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-09-01T13:49:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी सायन्स सिटी उभारणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा Rojgar News

Advertisement
: विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुणे लगतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे हा या संकल्पनेमागचा हेतू आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ८ एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. उर्वरीत ७ एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाचे विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारीत रु. १९१ कोटीचे vertical भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. वैज्ञानिक दृष्टीकोन, तंत्रज्ञानाचा समाज उन्नतीसाठी उपयोग विचारात घेऊन राज्य स्तरावर विज्ञान अविष्कार नगरीची उभारणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या. २१व्या शतकातील कौशल्ये ( 21st Century Skills), जागतिक नागरिकत्व (Global Citizenship), उद्योग 4.0 (Industry 4.0), उद्योजगकता (Entrepreneurship), वैज्ञानिक दृष्टीकोन (Scientific Temperament), बहु-अनुशासनातत्मक (Multidisciplinary), अनुभवात्मक शिक्षण (Experiential Learning) विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाच्या भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरीची (Science City) स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. २१ व्या शतकातील भारत घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध बनविण्याचे स्वप्न व दूरदृष्टी देऊन हे परिवर्तन करण्यासाठी विज्ञान या विषयाचे अनन्य साधारण आहे. देशाच्या विकासासाठी आणि बौद्धिक पातळी वाढीसाठी देशात संगणक व इंटरनेटची सुविधा त्यासाठी उभारण्यात आल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mQmghS
via nmkadda