Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-17T05:43:31Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आयटीआयच्या प्रवेशफेरीस अल्प प्रतिसाद Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई आयटीआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य अभ्यासक्रम घेण्यात येत आहेत. मात्र यंदा आयटीआयच्या पहिल्या प्रवेश फेरीत जागावाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशास अल्प प्रतिसाद दर्शवला आहे. पहिल्या प्रवेशफेरीसाठी ९० हजार ५४१ जागांचे वाटप झाले होते. मात्र त्यातील अवघ्या ३१ हजार ८५७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. एकूण वाटप जागांपैकी हे प्रमाण अवघे ३५.१९ टक्के आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक कौशल्याधारित करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी आयटीआयच्या माध्यमातून अनेक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र गतवर्षीपासून प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यंदाही पहिल्या फेरीसाठी शासकीय आयटीआयमध्ये ७५ हजार ६१ तर खासगी आयटीआयमध्ये १५ हजार ४८० अशा ९० हजार ५४१ विद्यार्थ्यांना जागा वाटप झाल्या होत्या. मात्र त्यातील अवघ्या ३२ हजार ३१५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४००पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची घट झाली आहे. पहिल्या फेरीमध्ये वाटप झालेल्या जागांमध्ये शासकीय आयटीआयच्या तुलनेत खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. शासकीय आयटीआयमध्ये ३३.०२ टक्के विद्यार्थ्यांनी तर खासगी आयटीआयमध्ये ४५.७० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या प्रवेश फेरीला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहेत. पहिल्या फेरीचे प्रवेश संपल्यानंतर आयटीआयकडून गुरुवारी दुसरी प्रवेश फेरी जाहीर केली. दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये ६१ हजार ९९० विद्यार्थ्यांना जागा वितरित झाल्या आहेत. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये ५३ हजार ७५६ तर खासगी आयटीआयमध्ये ८२३४ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप झाले आहे. दुसऱ्या फेरीच्या पहिल्या दिवशी ४९३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मुंबईचा टक्का वधारला आयटीआयच्या प्रवेशात मुंबई शहरातील आयटीआयमध्ये प्रवेशाचा टक्का वाढला आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये असलेल्या आयटीआयमधील दुसऱ्या फेरीत उपलब्ध असलेल्या एकूण १ लाख ४६ हजार २६४ उपलब्ध जागांपैकी केवळ ३२ हजार ३१५ जागांवर म्हणजेच केवळ २२.०९ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. यातील सर्वाधिक प्रवेश हे मुंबई शहरातील आयटीआयमध्ये (२९ टक्के) झाले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nCs92F
via nmkadda