अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात Rojgar News

अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात Rojgar News

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील ( Online Admission 2021) तिसऱ्या फेरीला मंगळवार ७ सप्टेंबर २०२१ पासून सुरुवात झाली आहे. दुसरी फेरी सोमवारी ६ सप्टेंबर रोजी संपली. आतापर्यंत अकरावी प्रवेशांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे ४५ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मुंबई विभागात पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या १२,२५४ विद्यार्थ्यांपैकी ९,२३९ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. उर्वरित विद्यार्थी तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत. या विद्यार्थ्यांना सर्व फेऱ्यांनंतर होणाऱ्या विशेष फेरीची वाट पाहावी लागेल. दुसऱ्या फेरीत महाविद्यालय अलॉट झालेल्या ६०,०३७ विद्यार्थ्यांपैकी २०,६४४ विद्यार्थ्यांनी सोमवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत आपले प्रवेश निश्चित केले होते. तिसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया ९ सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घ्यायचे आहेत, ते देखील महाविद्यालयांमध्ये जाऊन मंगळवार ते गुरुवार ९ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेऊ शकतात. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील उर्वरित जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी सरेंडर करण्याची मुदत १६ सप्टेंबर पर्यंत आहे. अकरावी दुसऱ्या फेरीची मुंबई विभागाची शाखानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - शाखा -- एकूण जागा (कोटा वगळून) -- एकूण अर्ज -- अलॉट झालेले प्रवेश कला -- १७,६०५ -- ९,८९१ -- ५,१२५ वाणिज्य - ७७,२५९ -- ८०,७५८ -- ३७,१८६ विज्ञान -- ४२,१८८ -- ४२,४६७ -- १७,३३३ एमसीव्हीसी -- २,७४२ -- ६०७ -- ३९३ एकूण विद्यार्थी -- १,३९,७९४ -- १,३३,७२३ -- ६०,०३७ मुंबई विभागात कला शाखेच्या एकूण १,७५८, वाणिज्यच्या ७,३५२, विज्ञान शाखेच्या ३,२८४ आणि एमसीव्हीसीच्या ३४८ अशा एकूण १३,२८२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले आहे. एकूण ११,०७५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या तर ८,३९८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कॉलेज अलॉट झाले आहे. मुंबई विभागात एसएससी बोर्डाच्या ५५,६६४, सीबीएसईच्या १,५७३ आणि आयसीएसईच्या २,१३१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत कॉलेज अलॉट झाले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BQMq8i
via nmkadda

0 Response to "अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel