पावसामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ९ आणि १० ऑक्टोबरला Rojgar News

पावसामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ९ आणि १० ऑक्टोबरला Rojgar News

MHT-CET Re-exam 2021: राज्यातल्या अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच काही ठिकाणी निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या देता आलेल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ९ आणि १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी आणि अन्य सीईटी परीक्षा राज्यभर विविध केंद्रांवर सुरू आहेत. पण गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही आणि त्या विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सीईटीच्या तारखांची आणि विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षेच्या निकषांची माहिती दिली. राज्यभरात २७ हजार विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा पावसामुळे हुकली असल्याची माहिती सामंत यांनी दिली. या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ९ आणि १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. ९ आणि १० ऑक्टोबरलादेखील पूरस्थिती असेल तरी या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार असे सामंत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोणकोणत्या कारणांमुळे सीईटी हुकलेले विद्यार्थी देऊ शकतील फेरपरीक्षा - - करोना झाला असल्यामुळे विद्यार्थ्याला सीईटी देता आली नसेल तर पुन्हा परीक्षा देता येईल. - अतिवृष्टीमुळे रस्ते पाण्यात गेल्याने परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नसेल तर अशा विद्यार्थ्यांना परीक्षा पुन्हा देता येईल. - डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या रोगांची बाधा झाल्यामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येणार. - पूरस्थितीमुळे वा पावसामुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचता आले नाही आणि परीक्षा हुकली असेल तर अशा विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येणार. - विद्यार्थ्याच्या घरात जर एखादी आकस्मिक घटना, दुर्घटना घडली असेल आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याची परीक्षा हुकली असेल तरी त्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39KQtqU
via nmkadda

0 Response to "पावसामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ९ आणि १० ऑक्टोबरला Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel