Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-09-02T07:43:56Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती Rojgar News

Advertisement
Bank of Maharashtra SO Recruitment 2021: बँकांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने पुणेस्थित मुख्यालयात आणि संपूर्ण देशभरातील विविध शाखांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल १ आणि २ पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँक द्वारे ३० ऑगस्ट २०२१ रोजी जारी झालेल्या अधिसूचनेनुसार अॅग्रीकल्चर, सिक्युरिटी, लॉ, एचआर/पर्सनेल आणि आयटी विभागांमध्ये स्केल १ आणि २ मध्ये विशिष्ट अधिकाऱ्यांच्या एकूण १९० पदांवर भरती होणार आहे. बँकेद्वारा या पदांसाठी अॅग्रीकल्चर, सायबर सिक्युरिटी, लीगल सर्विसेस आणि टेक्निकल सेक्टरसाठी भरती होणार आहे. कधी आणि कुठे करायचा अर्ज? बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाइट, bankofmaharashtra.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्जासाठी उमेदवारांना वेबसाइटच्या करियर सेक्शनमध्ये जावं लागेल, येथे भरती अधिसूचना डाऊनलोड करण्याची आणि ऑनलाइन अर्जांची लिंक दिली आहे. अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. उमेदवार १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत आपला अर्ज सबमीट करू शकतात. उमेदवारांनी परीक्षा शुल्कदेखील याच तारखेपर्यंत भरायचे आहे. अर्जात दुरुस्तीसाठी देखील अखेरची मुदत १९ सप्टेंबर २०२१ आहे. उमेदवार आपला ऑनलाइन सबमीट केलेला अर्ज ४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत प्रिंट करू शकणार आहेत. पात्रता काय? बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी पदांनुसार विविध प्रकारची पात्रता आवश्यक आहे. अॅग्रीकल्चर सेक्टरच्या भरतीसाठी उमेदवारांकडे कृषी/बागकाम/पशुपालन/पशुपालन/पशु विज्ञान/डेयरी विज्ञान/मत्स्य विज्ञान/मत्स्यपालन/कृषी मध्ये चार वर्षांची पदवी असणे आवश्यक आहे. अन्य पदांसाठी देखील सर्व माहिती भरतीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WNcl1Z
via nmkadda