आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर; ३१ पुरस्कारांवर शिक्षिकांची मोहोर Rojgar News

आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर; ३१ पुरस्कारांवर शिक्षिकांची मोहोर Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेच्या वतीने दरवर्षी जाहीर केल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांत यंदा शिक्षिकांनी कर्तृत्त्वाची मोहोर उमटवली आहे. यावर्षी पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या ५० पैकी ३१ पुरस्कार हे शिक्षिकांनी पटकावले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्काराचे स्वरूप १० हजार रुपये, पदक, शाल, श्रीफळ असे आहे. भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर रोजी असलेल्या जन्मदिनी, साजरा केल्या जात असलेल्या शिक्षकदिनाच्या निमित्ताने दरवर्षी महापालिकेकडून आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर केले जातात. शिक्षण विभागातील पालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड होते. १९७१पासून शिक्षकांना गौरविण्यासाठी पुरस्कार दिले जात आहेत. यंदा निवड झालेल्या शिक्षकांमध्ये पोपट होलगुंडे, सुजाता वळवी, संगीत झेंडे, रेखा कुपवडेकर, जया चिपळूणकर, योगिनी भोसले, निशा साळुंके, अनघा आदर, अंजुला पिंपळे, नम्रता गोसावी आदींचा समावेश आहे. १३० शिक्षकांपैकी ५० शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांसाठी १३० शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड समितीकडून निवड करताना १० वर्षे निष्कलंक सेवा, विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी केलेले कार्य, विद्यार्थ्यांसाठी केलेले लिखाण, उल्लेखनीय कार्य, शैक्षणिक प्रकल्पात घेतलेला सहभाग आदी निकष पहिले जातात. पुरस्कारांमध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, गुजराती, कन्नड माध्यमांच्या शाळांच्या शिक्षकांचा समावेश आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jE9S2q
via nmkadda

0 Response to "आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार जाहीर; ३१ पुरस्कारांवर शिक्षिकांची मोहोर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel