Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-23T06:43:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

जामिया कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना १४ लाखांचे पॅकेज, 'या' कंपन्यांनी दिली ऑफर Rojgar News

Advertisement
JMI Campus : जामिया मिलिया इस्लामियामधील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट या दिवसांमध्ये खूप चर्चेत आहे. येथे TCS, IBM, Deloitte आणि विप्रो सारख्या सुप्रसिद्ध कंपन्यांनी विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट (JMI Campus Placement 2021)ऑफर केले आहे. जामियामध्ये इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ऑफर मिळाल्या आहेत. त्याचबरोबर बी.टेकमधून सुमारे शंभर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जामिया मिलिया इस्लामिया (JMI) विद्यापीठात नुकत्याच आयोजित केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सर्वोच्च पॅकेज वार्षिक १४ लाख रुपये आणि सरासरी पॅकेज सुमारे ७ लाख रुपये आहे. दहापेक्षा जास्त बहुराष्ट्रीय कंपन्यांनी व्हर्च्युअल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित केले आहेत. विद्यार्थ्यांना नोकरी देणाऱ्या काही ब्रँडमध्ये टीसीएस, आयबीएम, डेलॉइट आणि विप्रो यांचा समावेश आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ऑफर मिळाली (JMI Campus Placement 2021) ते इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि कॉमर्स शाखेतील आहेत. व्हर्च्युअल कॅम्पस प्लेसमेंट जामिया मिलिया इस्लामिया (JMI) विद्यापीठातील कॅम्पस प्लेसमेंट (JMI Campus Placement 2021 Online) ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आले. टीसीएस, आयबीएम, डेलॉईट आणि विप्रो हे काही मोठे ब्रँड आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. जामिया मिलिया इस्लामियाच्या युनिव्हर्सिटी प्लेसमेंट सेलने ७ ऑगस्ट २०२१ रोजी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कॅम्पस प्लेसमेंट सुरू केले होते. सुमारे १०० विद्यार्थी निवडले प्लेसमेंट ऑफर मिळालेले विद्यार्थी इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि कॉमर्स स्ट्रीमचे आहेत. टीसीएस एक्सएल सर्व्हिसेस, जोश टेक्नॉलॉजी, ZS असोसिएट्स, इनोव्हेकर, पब्लिकिस सॅपिएंट, इन्फोएज आणि आयबीएम सारख्या कंपन्यांद्वारे बीटेक आणि एमसीए मधील सुमारे १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. डेलॉई द्वारे मास्टर ऑफ कॉमर्स (एमकॉम) चे ७ विद्यार्थी निवडले गेले आहेत. चांगल्या कंपन्यांना आमंत्रण प्लेसमेंट टीमचे अभिनंदन करताना युनिव्हर्सिटी प्लेसमेंट सेलचे संचालक प्रोफेसर झेडए जाफरी म्हणाले, 'यावर्षी आम्ही प्राधान्याच्या आधारावर चांगल्या कंपन्यांना आमंत्रित केले आहे. जामिया विद्यापीठाने निर्माण केलेले मजबूत उद्योग-शैक्षणिक संबंध, त्याच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि अध्यापनामुळे विद्यापीठाला देशभरातील काही मोठ्या कॉर्पोरेट नावांमध्ये टॉप ड्रॉ म्हणून उदयास येण्यास मदत झाली आहे. येत्या काही महिन्यांत JMI कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हसाठी आणखी कंपन्या रांगेत असल्याचेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u7PZEO
via nmkadda