Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-09-09T13:43:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी सेमिस्टर १ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर Rojgar News

Advertisement
ICSE, : काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने ICSE, ISC बोर्ड परीक्षा २०२१ सेमिस्टर १ परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर १ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार ISCE ची अधिकृत वेबसाइट cisce.org वर जाऊन वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. आणि ISC या दोन्हीसाठी सेमिस्टर १ ची परीक्षा १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. ६ डिसेंबरला दहावी आणि १६ डिसेंबरला बारावीची परीक्षा समाप्त होईल. दहावीच्या परीक्षा दररोज सकाळी ११ वाजता सुरू होतील आणि परीक्षेचा कालावधी १ तास असणार आहे. तर बारावीची परीक्षा दररोज दुपारी २ वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा कालावधी दीड तास आहे. पेपर सोडवण्यासाठी वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटे वेळ देण्यात आला आहे. ICSE, ISC बोर्ड परीक्षा 2021 वेळापत्रक असे करा डाउनलोड स्टेप १ : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cisce.org वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: तुमच्या स्क्रीनवर PDF उघडेल. स्टेप ४: आता तुम्हाला वेळापत्रक दिसेल. स्टेप ५: वेळापत्रक तपासा आणि डाउनलोड करा. यावर्षी CISCE ने कोविड-१९ संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर विशिष्ट सूत्रानुसार, मूल्यांकन करत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला होता. २४ जुलै रोजी बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. यावर्षीICSE म्हणजेच दहावीचा निकाल ९९.९८ टक्के होता. ISC म्हणजेच बारावीच्या निकालाची उत्तीर्णता ९९.७६ टक्के होती. विद्यार्थी लेटेस्ट अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे वेळापत्रक काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने(Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीआयएससीईच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार दोन्ही परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. टाइमटेबलनुसार, इयत्ता दहावीसाठी कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरू होCतील आणि ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरू राहतील. इयत्ता बारावीसाठी कंपार्टमेंट आणि सुधार परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरु होतील आणि ७ सप्टेंबर २०२१ रोजी समाप्त होईल. दोन्ही परीक्षांच निकाल २० सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VqEJWY
via nmkadda