ट्रान्सजेंडर्ससाठी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम Rojgar News

ट्रान्सजेंडर्ससाठी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीकडून (एसएसपीयू) टेलरिंग, सॅनिटरी पॅड मेकिंग ,ब्युटी सर्व्हिसेस, हर्बल प्रॉडक्ट अशा प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येणार आहे. सिम्बायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगच्या कार्यालयात ट्रान्सजेंडर समूहातील लोकांना कौशल्यशिक्षण देण्यासाठीचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला. या वेळी सिम्बायोसिस संस्थेच्या संजीवनी मुजुमदार, युनिव्हर्सिटीच्या उपकुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, ग्रॅsव्हिट्स कॉर्पोरेशनच्या संचालक उषा काकडे आणि सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी उपस्थित होत्या. 'या अभ्यासक्रमांच्या शुल्कासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी ग्रॅव्हिट्स कॉर्पोरेशनकडून मदत करण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. ट्रान्सजेंडर लोकांनी पुढे येऊन आता कौशल्य शिक्षण घ्यावे,' असे आवाहन त्रिपाठी यांनी केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nT7xmY
via nmkadda

0 Response to "ट्रान्सजेंडर्ससाठी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel