Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक बारावीमध्ये उच्चतम गुणवत्ताप्रपात विद्यार्थ्यांना पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारमार्फत सेंट्रल सेक्टर (Central Sector Scheme of for College and University Students) दिली जाते. यासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ३० नोव्हेंबरर्पंत विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. भारत सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी ज्या विद्यार्थ्यांचा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या टॉप २० पर्सेंटाइलमध्ये समावेश असेल त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या या प्रक्रीयेमध्ये यंदा महाराष्ट्रातील ७ हजार ४१७ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला नव्याने मंजुरी दिली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. नव्याने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी केंद्र सरकारकडून तयार करण्यात येणार असून, त्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ होणार आहे. याचसोबत ज्या विद्यार्थ्यांना जुन्या अर्जांचे नूतनीकरण करावयाचे आहे, त्यांनाही अर्ज दाखल करता येणार आहे. नवीन अर्जांसाठी तसेच जुन्या अर्जांचे नूतनीकरण करण्यासाठीही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, ऑफलाइन भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्याचसोबत विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जांची महाविद्यालयांना ऑनलाइन पडताळणी करावी लागणार असून, यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. भारत सरकारच्या www.scholorships.gov.in या संकेस्थळावर तसेच उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सविस्तर माहिती मिळणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38CxwGu
via nmkadda