Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-09-22T09:43:23Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

राज्यातील आरोग्य विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

Advertisement
Maharashtra Health Mission Recruitment: महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या भरतीअंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी कॅटेगरीतील स्टोअर गार्ड, प्रयोगशाळा शास्त्रज्ञ अधिकारी, फार्मास्युटिकल अधिकारी, स्टाफ नर्स, कनिष्ठ लिपिक आणि इतर रिक्त पदे भरली जाणार आहेत. पदभरतीसाठी २५ आणि २६ सप्टेंबर २०२१ ला लेखी परीक्षा होणार असून याचे प्रवेशपत्र वेबसाइटवर लॉगिन करून डाऊनलोड करता येईल. ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केलाय ते अधिकृत वेबसाइट arogya.maharashtra.gov.in वर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करू शकता. तसेच nrhm.maharashtra.gov.in वर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. आरोग्य विभाग महाराष्ट्र २०२१ परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. स्टेप १: उमेदवारांनी arogya.maharashtra.gov.in किंवा nrhm.maharashtra.gov.in वर लॉगिन करा स्टेप २: त्यानंतर उमेदवारांना आरोग्य विभाग महाराष्ट्र प्रवेशपत्र २०२१ या लिंकवर क्लिक करा स्टेप ३ : एक नवीन पेज उघडेल स्टेप ४: उमेदवारांनी महत्वाची माहिती भरा स्टेप ५: प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल आरोग्य विभाग महाराष्ट्र २०२१ परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या. परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्र अनिवार्य आहे. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. आरोग्य विभाग महाराष्ट्र २०२१ परीक्षेसाठी उमेदवारांनी जास्त वेळ वाया न घालविता प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट arogya.maharashtra.gov.in किंवा nrhm.maharashtra.gov.in वर लॉगिन करावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XECpw9
via nmkadda