Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-03T07:43:30Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी नोंदणीत घट Rojgar News

Advertisement
मुंबई: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा जाहीर केलेल्या दहावी आणि बारावीच्या निकालात जवळपास सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक गुण मिळाले आहेत. दोन्ही निकाल भरघोस लागले आहेत. परिणामी पुरवणी परीक्षांसाठी ( ) फारच थोड्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ही परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची आणखी एक संधी देते. ऑफलाईन परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. दहावीच्या सुमारे १६ लाख एसएससी आणि बारावीच्या सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यांकन पद्धतीच्या आधारे घोषित केले गेले. त्यामुळे या गुणांवर समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाने पुरवणी परीक्षेची संधी दिली आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यातून अवघे १०,६४९ विद्यार्थी बसणार आहेत. यापैकी मुंबई विभागातील एकूण ३,५८५ विद्यार्थी आहेत. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यातील १२,३४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुंबईतून अवघे ४,७४४ विद्यार्थी बारावीची पुरवणी परीक्षा देणार आहेत. बोर्डातील एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली की 'यावर्षी खासगी आणि पुनरावृत्ती करणारे विद्यार्थी परीक्षेशिवाय उत्तीर्ण झाले. त्यांना फेर परीक्षेसाठी उपस्थित राहायचे नाही.' दहावी फेरपरीक्षेसाठी नोंदणी केलेले अनेक विद्यार्थी एक किंवा दोन विषयात नापास झाले आहेत किंवा अंतर्गत मूल्यांकनासाठी उपलब्ध नव्हते. बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांची बारावीची टक्केवारी सुधारायची असते, असे विद्यार्थी फेरपरीक्षा देतात, असे हे अधिकारी म्हणाले. परीक्षा कधी? दहावीची परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://ift.tt/2LiFk7A या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DSYOXB
via nmkadda