Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-23T07:43:36Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'या' लिंकवरुन करा डाउनलोड Rojgar News

Advertisement
Admission Test: राष्ट्रीय चाचणी एजन्सीने दिल्ली विद्यापीठ २०२१ साठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- nta.ac.in किंवा ntaexam2021.cbtexam.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज फॉर्म क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करावी लागेल. दिल्ली विद्यापीठामधील प्रवेशाची (Delhi University 2021) प्रक्रिया राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे आयोजित केली जात आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू झाली. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला होता. तसेच पूर्ण फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीखही तीच होती. आता या परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. ही परीक्षा २६ ते ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येईल. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकेल. DUET Admit Card 2021: प्रवेशपत्र करा डाउनलोड सर्वप्रथम nta.ac.in किंवा ntaexam2021.cbtexam.in या वेबसाइटवर जा. 'DUET २०२१ साठी प्रवेशपत्र डाउनलोड करा' या लिंकवर क्लिक करा उमेदवारांना DUET प्रवेशपत्र २०२१ डाउनलोड करण्यासाठी बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे. आपला फॉर्म क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा आणि नंतर लॉगिनवर क्लिक करा. तुमचे DUET प्रवेशपत्र २०२१ तुमच्या स्क्रीनवर NTA द्वारे प्रदर्शित केले जाईल. भविष्यातील संदर्भांसाठी त्याची एक प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा. DUET चे आयोजन २६ सप्टेंबरपासून दिल्ली विद्यापीठात एन्ट्रन्स बेस प्रवेशासाठी २६ सप्टेंबरपासून DUET आयोजित केली जाईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) लवकरच प्रवेश परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्याबाबत माहिती देण्यात आली होती. प्रवेशपत्र जाहीर करण्याच्या तारखेसंदर्भात कोणतेही अधिकृत अपडेट देण्यात आले नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दिल्ली विद्यापीठाने (DU) आपल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षिणक धोरण (NEP) आणि २०२२-२३ सत्रापासून चार वर्षांच्या पदवीधर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली. 'NEP शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून लागू करण्यात येईल असे रजिस्टार विकास गुप्ता यांनी सांगितले.अंमलबजावणीबाबत तीन सदस्यांनी असहमती दर्शविली. NEPआणि चार वर्षांच्या पदवीधर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला गेल्या आठवड्यात स्थायी समिती आणि शैक्षणिक परिषदेने मान्यता दिल्याचेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lQPHhJ
via nmkadda