Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-03T08:43:57Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

देशाच्या सुरक्षा विभागात ४०० हून अधिक जागा रिक्त Rojgar News

Advertisement
Ministry of Defence : संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence)ASC सेंटरसाठी सिव्हिल मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, एमटीएस आणि इतर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. २८ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१ च्या रोजगार वर्तमानपत्रात या पदांचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत उमेदवार संरक्षण मंत्रालय भरती २०२१ साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण ४०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त पदांचा तपशील जाणून घ्या एएससी केंद्र (नॉर्थ) , फक्त पुरुष उमेदवारांसाठी सिव्हिल मोटर ड्रायव्हर: ११५ पदे क्लिनर: ६७ पदे कुक: १५ पदे सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर: ३ पदे एएससी केंद्र (दक्षिण) कामगार (पुरुष): १९३ पदे एमटीएस (सफाई कर्मचारी): ७ पदे पात्रता निकष जाणून घ्या या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून मॅट्रिक परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रतेबद्दल तपशीलवार माहिती अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. सिव्हिल मोटर ड्रायव्हर पदासाठी उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांदरम्यान असावे. तर, इतर पदांसाठी उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षां दरम्यान निश्चित करण्यात आले आहे. पात्रता निकषांची तपशीलवार माहिती बातमीखाली दिलेल्या लिंकद्वारे मिळू शकते. अशी होईल निवड कौशल्य / शारीरिक / सराव चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. आवश्यक असल्यास लेखी परीक्षा देखील घेतली जाऊ शकते. याप्रमाणे अर्ज करा उमेदवाराने आपला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह नोटिफिकेशनमधील नमुन्याप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. तसेच दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VaZWEb
via nmkadda