एचडीएफसी बँकेतर्फे ग्रामीण भागात २५०० हून अधिक जागांची भरती Rojgar News

एचडीएफसी बँकेतर्फे ग्रामीण भागात २५०० हून अधिक जागांची भरती Rojgar News

Recruitment 2021: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्ज देणारी एचडीएफसी बँकेने राज्यातील बेरोजगरांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. एचडीएफसी बॅंक शहरातून आता ग्रामीण भागात आपली पोहोच दुप्पट करत आहे. येत्या काही दिवसात एचडीएफसी दोन लाख गावांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी बँकेतर्फे पुढील सहा महिन्यांत २ हजार ५०० लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील १८ ते २४ महिन्यांत शाखा नेटवर्क, व्यवसाय प्रतिनिधी, सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर), भागीदार, व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि डिजिटल आउटरीच प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण भागात आपला सहभाग दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बँकेने म्हटले आहे. तत्पूर्वी रविवारीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या सुलभतेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्यांना त्यांची उपस्थिती आणखी वाढवण्यास सांगितले. त्यानंतर एचडीएफसीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय जाहीर केला. एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड (कमर्शियल अँड रूरल बँकिंग) राहुल शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली. 'भारतातील ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये बँकेटा विस्तार कमी आहे. भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी दीर्घकालीन वाढीच्या संधी याद्वारे निर्माण केल्या जातील' असे ते म्हणाले. पुढे जाऊन देशातील प्रत्येक पिनकोडमध्ये सेवा उपलब्ध करणे हे बॅंकेचे उद्दीष्ट असल्याचेही ते म्हणाले. या विस्तारानंतर देशातील एक तृतीयांश ग्रामीण भागांमध्ये बँकेचे अस्तित्त्व निर्माण होणार असल्याची माहिती एचडीएफसीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. एचडीएफसी बॅंकेच्या या उद्दीष्टामुळे प्रत्येक व्यक्तीला बँकिंग क्षेत्राशी जोडणे सोपे होणार आहे आणि लोक जास्तीत जास्त बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील ग्रामीण आणि अर्ध-शहरी भाग अजूनही क्रेडिट आणि कर्जाच्या सेवांपासून मोठ्या प्रमाणावर दूर असल्याचे दिसून येते. बँकिंग व्यवस्थेच्या शाश्वत विकासात ही क्षेत्रे मोठी भूमिका बजावू शकतात असे राहुल शुक्ला म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EWLZfi
via nmkadda

0 Response to "एचडीएफसी बँकेतर्फे ग्रामीण भागात २५०० हून अधिक जागांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel