बारावी पास असणाऱ्यांनी डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी करा अर्ज, मिळेल 'इतका' पगार Rojgar News

बारावी पास असणाऱ्यांनी डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी करा अर्ज, मिळेल 'इतका' पगार Rojgar News

ICSIL : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टम इंडिया लिमिटेड, आयसीएसआयएलमध्ये मोठी संधी आहे. आयसीएसआयएलने , डीईओ या पदावर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. १६ सप्टेंबर ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत पोर्टल ics icsil.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ही भरती ठराविक मुदतीसाठी असणार आहे. अंतिम तारखेनंतर आलेला कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख: १३ सप्टेंबर २०२१ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ सप्टेंबर २०२१ इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेडने जाहीर केलेल्या नोटीफिकेशननुसार, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक तपशील तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन शकतात. ICSIL ने मल्टी-टास्किंग स्टाफच्या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या भरती अंतर्गत ICSIL एकूण ५० मल्टी टास्किंग स्टाफ पदांची भरती करणार आहे. ही भरती फक्त कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जाणार आहे. या पदांवरील उमेदवारांची अंतिम निवड दहावी मार्कशीट, आयटीआय मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या पडताळणीवर करायची आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९ हजार २९१ रुपये वेतन दिले जाईल. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tCNqds
via nmkadda

0 Response to "बारावी पास असणाऱ्यांनी डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी करा अर्ज, मिळेल 'इतका' पगार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel