नर्सिंग पदविकेचे प्रवेश बारावीच्या मार्कांवरच Rojgar News

नर्सिंग पदविकेचे प्रवेश बारावीच्या मार्कांवरच Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक बारावीनंतर नर्सिंग पदविकेच्या 'एएनएम' व 'जीएनएम' या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा लागू करण्याबाबतची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती. परंतु, या चर्चेला सध्या तरी विराम देण्यात आला असून, यंदा हे प्रवेश बारावीच्या मार्कांवरच होणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल बोर्डामार्फत बारावीनंतर नर्सिग अभ्यासक्रमाचे ऑग्झिलरी नर्स मिडवाईफरी (एएनएम) व जनरल नर्सिंग मिडवाइफरी (जीएनएम) हे अनुक्रमे दोन व तीन वर्षांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातात. बारावीच्या मार्कांवर कोणत्याही विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. २०१८ पासून या अभ्यासमक्रमांची व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषणा करण्यात आली होती. या अभ्यासक्रमाचे शुल्क ठरविण्याच्या बैठकीदरम्यान शुल्क नियमन प्राधिकरणामार्फत (एफआरए) या प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ, एफआरए व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या काही बैठकाही झाल्या होत्या. परंतु, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचा विचार करून प्रवेश परीक्षा न घेता बारावीच्या मार्कांवरच प्रवेश देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केला आहे. याबाबत राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल बोर्डाशी संपर्क साधला असता, यंदाच्या प्रवेशांसाठी तरी बारावीच्या मार्कांवरच प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नर्सिंगच्या पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींचा सहभाग अधिक असतो. या मुली ग्रामीण, आदिवासी तसेच दुर्गम भागातील असतात. त्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत असतात. या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा लागू केल्यास अनेक विद्यार्थिनी या शिक्षणापासून दूर राहू शकतात. त्यामुळे प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय यंदा रद्द केल्याची माहिती नर्सिंग व पॅरामेडिकल बोर्डामार्फत देण्यात आली. राज्यभरातर जवळपास ८५० महाविद्यालयांमध्ये या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रत्येक वर्षाला जवळपास दहा हजार मुली शिक्षण घेतात. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी आरोग्य सेवेचा मोठा आधार आहेत. त्यांचा विचार करूनच प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय परिचर्या परिषदेच्या सूचनेनुसार लवकरच या वर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. -छाया लाड, प्रबंधक राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल बोर्ड


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38NITLy
via nmkadda

0 Response to "नर्सिंग पदविकेचे प्रवेश बारावीच्या मार्कांवरच Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel