Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-03T10:43:11Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

जेएनयूमध्ये वादग्रस्त दहशतवादविरोधी कोर्सची होणार अंमलबजावणी Rojgar News

Advertisement
Anti Terrorism Course: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या () कार्यकारी परिषदेने गुरुवारी नवीन दहशतवादविरोधी अभ्यासक्रमाला मान्यता दिली असून याची अंमलबजावणी होणार आहे. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या अभ्यासक्रमावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एका गटातून विरोध होत आहे. यासोबतच परिषदेने दरवर्षी १४ ऑगस्टला 'फाळणी स्मृती दिवस' साजरा करण्यास मान्यता दिली. नवीन दहशतवादविरोधी अभ्यासक्रमावरुन विद्यापीठात दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. एक गट अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीला विरोध करत आहे. त्यावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू एम.जगदेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शैक्षणिक गुणवत्ता लक्षात न घेता अनावश्यक वाद निर्माण केला जात आहे असे ते म्हणाले. 'भारताच्या शेजारील देशांमध्ये ज्या प्रकारे गोष्टी घडत आहेत, त्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे सिद्ध होत आहे. अशावेळी जेएनयूसारख्या शैक्षणिक संस्थेने पुढाकार घेऊन दहशतवादविरोधी तज्ञांचा एक चांगला गट तयार करणे आवश्यक आहे', असे कुलगुरुंनी यावेळी म्हटले. हा अभ्यासक्रम सर्वांगीण आहे हे स्पष्ट करताना कुलगुरू म्हणाले की, 'यात प्रमुख्याने दहशतवादविरुद्ध सहकार्याची भूमिका, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक प्रयत्नांचा समावेश असेल.' 'या अभ्यासक्रमातून कोणत्याही समुदायाला लक्ष्य करण्यात आले नाही. हा पूर्णपणे शैक्षणिक अभ्यासक्रम आहे. जेएनयूने २०१८ मध्ये ड्युअल डिग्री प्रोग्रामसह स्कूल ऑफ इंजिनीअरिंगची स्थापना केली होती.' असे दहशतवादविरोधी अभ्यासक्रमाची रचना करणारे जेएनयूचे प्राध्यापक अरविंद कुमार यांनी सांगितले. दरम्यान जेएनयूने १४ ऑगस्ट रोजी साजरा केल्या जाणाऱ्या फाळणी दिवसानिमित्त एक निवेदन जाहीर केले आहे. यानुसार विद्यापीठात दरवर्षी फाळणी दिनानिमित्त वेबिनार/सेमिनार, प्रदर्शन, विशिष्ट व्याख्याने, इतर संबंधित उपक्रमांद्वारे घडलेल्या घटनांची खरी माहिती आठवून विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. जेणेकरून तरुण पिढीला फाळणीबद्दल माहिती मिळेल. फाळणीच्या वेळी लाखो भारतीयांना आपले प्राण कसे गमवावे लागले याची माहिती दिली जाईल. जेएनयूच्या शैक्षणिक परिषदेने १७ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत दहशतवादविरोधी अभ्यासक्रमासह तीन नवीन अभ्यासक्रमांना परवानगी दिली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38CRwIX
via nmkadda